कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनमध्ये आता मानवाला बर्ड फ्लूचा संसर्ग


वृत्तसंस्था

बीजिंग : कोरोनाच्या उद्रेकाला जबाबदार असलेल्या चीनमध्य आता आणकी एक संसर्गाचा जन्म झाला आहे. ‘बर्ड फ्लू’च्या एच १० एन ३ या विषाणूचा मानवाला संसर्ग झाल्याची पहिली घटना चीनमध्ये उघडकीस आली आहे. चीनच्या जिआंगसू प्रांतात एका ४१ वर्षीय व्यक्तीला हा संसर्ग झाला आहे.
बर्ड फ्लूच्या विषाणूचे अनेक प्रकार चीनमध्ये आढळून येतात. पोल्ट्री व्यवसायात काम करणाऱ्या लोकांना तो होत असल्याचेही दिसून आले आहे. एप्रिल महिन्यात चीनमध्ये बर्ड फ्लूच्या ‘एन५एन६’ या विषाणूचा संसर्ग पसरल्याचे आढळून आले होते. China find new patent of bird fluया व्यक्तीची प्रकृती उत्तम असून तिला लवकरच घरी पाठवले जाईल, असे वृत्त चिनी माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. हा पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांपासून हा मानवाला झालेला संसर्ग असून त्याची साथ पसरण्याची चिन्हे नाहीत, असे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. संबंधित रुग्णाला ‘एच १० एन ३’ विषाणूचा संसर्ग झाल्याचे २८ मे रोजी स्पष्ट झाले होते. त्यानंतर असे दुसरे कोणतेही प्रकरण आढळून आलेले नाही. हा विषाणू फारसा प्रभावी आणि संसर्गक्षम नसल्याने प्रसार होण्याची भीती नाही, असेही चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले.

China find new patent of bird flu

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण