विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लसीकरणाचे चांगले परिणाम जगातील अनेक देशात आता वेगाने दिसू लागले आहेत. अनेक देशांनी त्यांच्या देशात आता नागरिकांना मास्क वापरण्यापासून सूट देण्यास सुरुवात केली आहे. भूतान, चीन तसेच न्यूझीलंडमध्ये आता यापुढे मास्कविना फिरण्यास नागरिकांना अनुमती देण्यात आली आहे.China, Bhutan, New zeland became Mask free
कोविड संसर्गाची लाट चांगल्या रितीने हाताळणाऱ्या न्यूझीलंडचे जगभरात कौतुक होत आहे. पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांच्या प्रयत्नामुळे देशभरात केवळ २६ जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारच्या गतिशील कारभारामुळे न्यूझीलंड मास्क फ्री देश बनला आहे.
काही दिवसांपूर्वीच ऑकलंडमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि तेथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता आणि मास्क न घालता सुमारे ५० हजार नागरिक जमले होते.
चीनने कमी कालावधीच लसीकरणाची मोहीम राबवत मास्क घालण्याच्या नियमावर मात केली आहे. जगातील सर्वाधिक बाधित देशांत चीनचा समावेश होता. परंतु आता पर्यटन क्षेत्रही सुरू केले आहे. भूतानमध्ये केवळ दोन आठवड्यातच ९० टक्क्यांहून अधिक वयस्कर लोकांनी लस घेतली आहे.
कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर भूतानमध्ये संसर्गामुळे केवळ एकच व्यक्ती दगावला आहे. चीन आणि भारताच्या सीमा भुतान लगत असल्या तरी या देशात कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव झाला नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App