मुलांचं लसीकरण तातडीने केले पाहिजे, गेल्या २० दिवसांत १ हजार ७११ मुलांना करोनाची लागण ; आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुलांचे तातडीने लसीकरण करण्याची तसेच खबरदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असं टोपे यांनी सांगितलं.Children should be vaccinated immediately, 1,711 children have been infected with coronavirus in the last 20 days; Information given by the Minister of Health


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राज्यात कोविड स्थिती सध्या नियंत्रणात आहे. करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. दैनंदिन रुग्णसंख्या सहाशेपर्यंत खाली आली आहे.कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसल्यावर राज्य सरकारने कोरोनवरील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यास सुरुवात केली होती.

यामध्ये मग हॉटेल्स, मॉल, थिएटर, मंदिर यांचं समावेश होता. ऑनलाईन शिक्षणावर कोरोना काळात जास्त भर देण्यात आला होता. दरम्यान हळूहळू शाळा महािद्यालये सुरू करण्यात आली. दिवाळीच्या सुट्टी नंतर दुसऱ्या सत्रात पुन्हा शाळा सुरू झाल्या.दम्यान राज्यात शाळा सुरू झाल्या असतानाच गेल्या २० दिवसांत ११ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचा एकमेकांशी संपर्क वाढून या वयोगटातील १ हजार ७११ मुलांना करोनाची लागण झाल्याचं आढळलं.तसेच मुलांमध्ये लक्षणे सौम्य असली तरी ही मुले स्प्रेडरचं काम करू शकतात. त्यामुळेच मुलांचे तातडीने लसीकरण करण्याची तसेच खबरदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असं टोपे यांनी सांगितलं.

पुढे टोपे म्हणले की , दिवाळीनंतर दुसऱ्या सत्रात शाळेचे सर्वच वर्ग सुरू करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.त्यामुळे याचा त् विचार करून पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाला आरोग्य विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेतील असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.

सध्या आरोग्य विभागाने लहान मुलांचे लसीकरण आणि ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण यावर टोपे यांनी अधिक भर दिला. कोविडचा धोका पाहता लहान मुलांचे तातडीने लसीकरण करण्याची गरज असून आणि दोन्ही डोस घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही बूस्टर डोस देण्याची आवश्यकता आहे, असं टोपे म्हणाले.

Children should be vaccinated immediately, 1,711 children have been infected with coronavirus in the last 20 days; Information given by the Minister of Health

महत्त्वाच्या बातम्या