शेतकरी कायदा मागे घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आनंद


विशेष प्रतिनिधी

मुबंई : आज गुरुनानक जयंतीचे औचित्य साधून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी कायदे मागे घेतल्याची घोषणा केलेली आहे. यामुळे आंदोलनकर्त्या शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. मागील जवळपास वर्षभरापासून कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू होते. विरोधी पक्षांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र भाजप नेते या निर्णयावर नाराज आहेत असे चित्र दिसत आहे.

Chief Minister Uddhav Thackeray expressed happiness over the withdrawal of Farmers Act

आपली प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकरी कायद्या विरोधात देशभर विरोधाचे वातावरण होते. अांदाेलने सुरू होती आणि ती आजही सुरू आहेतच. आपल्या सर्वांचे पोट भरणाऱया अन्नदात्याचे, शेतकर्यांचे यात नाहक बळी गेले आहेत. याच अन्नदात्यांनी आपली आज शक्ती दाखवून दिली आहे. त्या सर्वांना माझे त्रिवार वंदन. जे वीर या आंदोलनात प्राणास मुकले, त्यांना मी यानिमित्तानं नम्र अभिवादन करतो. असे त्यांनी म्हणाले.


शेतकरी कायदा मागे घेतल्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नाखूष


पुढे ते म्हणतात की, महाविकास आघाडीने देखील शेतकरी कायद्या विरोधातील आपली भूमिका वेळोवेळी मांडली होती. विधि मंडळात देखील या कायद्याच्या दुरूस्तीवर चर्चा करण्यात आली होती. केंद्राने यापुढे कोणताही निर्णय घ्यायच्या आधी विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटना यांना विश्वासात घेऊन संपूर्ण देशाच्या दृष्टीने हिताचा निर्णय घ्यावा.

Chief Minister Uddhav Thackeray expressed happiness over the withdrawal of Farmers Act

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी