छत्तीसगडमध्ये विधानसभा इमारतीचे बांधकाम सरकारने थांबविले, कोरोनामुळे अनेक प्रकल्पांच्या कामांना ‘ब्रेक’


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड राज्य सरकारने नव्या विधिमंडळाच्या उभारणीसाठी काढलेल्या निविदा आज रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच अन्य बड्या प्रकल्पांची कामे देखील थांबविण्यात आली आहेत.Chhattisgarh govt. ban assembly building work

याबाबत मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले, आमचे नागरिक हेच आमच्यासाठी प्राधान्याचा विषय आहेत. कोरोनाचा संसर्ग सुरू होण्यापूर्वी या वास्तूंच्या उभारणीचे काम सुरू झाले होते. या संकटाच्या काळामध्ये आम्ही सगळी कामे थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.सध्या नव्या रायपूरच्या भागामध्ये विधिमंडळाच्या उभारणीचे काम सुरू होते. राज्यपालांचे निवासस्थान, विधिमंडळ, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, अन्य मंत्री आणि अधिकारी यांची निवासस्थाने तसेच सर्किट हाउसची उभारणी तातडीने थांबविण्यात आली आहे, या प्रकल्पाचे २५ नोव्हेंबर २०१९ रोजी भूमिपूजन करण्यात आले होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी कंत्रांटदारांना सर्वप्रकारच्या प्रकल्पांची कामे थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरून काँग्रेसने भाजपवर टीका केली होती.

Chhattisgarh govt. ban assembly building work

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण