वृत्तसंस्था
बीजिंग : आता चीनची ‘नॅनो कार’ बाजारात येणार आहे. विशेष म्हणजे ती इलेक्ट्रिकवर धावणारी असून जगातील सर्वात छोटी आणि इतर कारच्या तुलनेत स्वस्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. chayna electric car Wuling Nano EV will come in market, Price is around 2.30 lakh टाटा कंपनीने जगातील छोटी कार म्हणून ‘नॅनो’ काही वर्षांपूर्वी सादर केली होती. आता त्या कारचे उत्पादन बंदही केले आहे. त्यानंतर टाटा कंपनीने या नॅनो कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात आणण्याचे प्रयत्न जेम मोटर्सच्या सहकार्याने सुरु केले आहे. अशातच चीनच्या एक कंपनीने नॅनो इलेक्ट्रिक कार बाजारात आणण्याचे जाहीर केले आहे. या कारची किंमत २.३०लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘ वूलींग नॅनो इव्ही’ (Wuling Nano EV) असे कारचे नामकरण करण्यात आले आहे. किंमत आणि आकार हा मारुती अल्टो पेक्षा कमी असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच कॉम्पैक्ट इलेक्ट्रिक कार वूलिंग होंगगुआंग मिनी ईवी पेक्षा या कारला अधिक मागणी असेल असे सांगण्यात आले आहे.
टाटांची नॅनो इलेक्ट्रिक कार अधिक तगडी
2021 टियांजिन इंटरनेशनल ऑटो शो मध्ये ही कार सादर केली होती. ही कॉम्पैक्ट कार असून त्यात फक्त दोघेजण बसू शकतात. या उलट टाटा नॅनोमध्ये किमान पाच माणसे बसून प्रवास करू शकतात. जर टाटा कंपनीचे इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात आले तर चीनच्या कारला मोठा झटका बसणार आहे, हे निश्चित. कारण नॅनो कार चीनच्या कारपेक्षा अधिक सरस आहे.
कारचे आकारमान
लांबी : २४९७ मीटर ( टाटा नॅनो 3000 मिमी ) रुंदी : १५२७ मीमी उंची : १६१६ मीमी २८ kWh IP६७ -प्रमाणित लिथियम-आयन बैटरी बैटरी ५ एनएमचा टोर्क वेग: तासात १०० किमी धाव : एकदा चार्ज केल्यावर ३०० किलोमीटर
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App