किरीट सोमय्या यांनी पोलिस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांच्याविरोधात राष्ट्रीय मानवाधिकारी आयोगाकडे तक्रार दाखल केली.Complaint against Vishwas Nangre Patil, possibility of getting into trouble, National Human Rights Commission took notice
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बेकायदा घरात डांबून ठेवल्या प्रकरणी मुंबई पोलिस दलातील सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याविरोधात किरीट सोमय्या यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे.
यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, किरीट सोमय्या यांची तक्रार अद्याप माझ्याकडे आलेली नाही. माझ्याशिवाय ती अन्य सदस्यांकडे येऊ शकते; परंतु शासकीय अधिकाऱ्यांसंदर्भातील ही तक्रार असल्याने महाराष्ट्र सरकारला या प्रकरणात काय कारवाई झाली याबाबत अहवाल मागितला जाईल. त्यानंतर ते प्रकरण आयोग हाताळेल.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर सोमय्या कोल्हापूरला येत होते. त्या दिवशी त्यांना बेकायदा घरात डांबून ठेवून ठेवले. तसेच रेल्वेत बसण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता.याविरोधात किरीट सोमय्या यांनी पोलिस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांच्याविरोधात राष्ट्रीय मानवाधिकारी आयोगाकडे तक्रार दाखल केली.
दोन दिवसांपूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असून, नांगरे-पाटील महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम करीत आहेत, त्यांनी सहा तास घरात कोंडून ठेवल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात सोमय्या यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, कोल्हापूरला जात असताना मला मुंबईतच रोखण्यात आले व घरात डांबून ठेवण्यात आले. घोटाळेबाजांना वाचवण्यासाठी नांगरे पाटील यांनी पदाचा गैरवापर केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App