कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी युनिक आर्टिस्ट्स सोसायटीचे चंडीगडमध्ये ऍप्रन पेंटिंग


वृत्तसंस्था

चंडीगड – कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरातले विविध क्षेत्रातले लोक, कलावंत आपापल्या परीने काम करताना दिसत आहेत. असा एक प्रयत्न चंडीगडमधल्या युनिक आर्टिस्ट्स सोसायटीच्या सदस्यांनी केला आहे. Chandigarh Unique Society of Artists members painted aprons to motivate people for Covid vaccination.

लोकांनी स्वतःहून पुढे येऊन कोरोना प्रतिबंधक लसीकरण करवून घ्यावे याला प्रेरणा देण्य़ासाठी ऍप्रन पेंटिंग हा उपक्रम सुरू केला आहे. कोरोना लसीकरणाच्या विविध थीम्सची पेंटिंग हे कलाकार ऍप्रनवर करीत आहेत. तसेच विविध पोस्टर्स देखील तयार करीत आहेत.

कोरोना लसीकरणाबरोबर आज समाजात सकारात्मक विचारांच्या प्रसाराचीही गरज आहे. त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या थीम्स शोधून त्यावर आधारित पेंटिंग करीत आहोत. घरात राहून सकारात्मक विचार जोपासाताना कोणतीही कला कशी उपयोगी ठरू शकते याचा विचार करून आम्ही पेंटिंग्ज केली आहेत. सोशल मीडियातून ती शेअर केली जात आहेत.

कोरोना विरोधातील लढाईल हे आमचे छोटे योगदान आहे, असे युनिक आर्टिस्ट्स सोसायटीच्या सदस्या सीता यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले. पेंटिंग आणि संगीत या दोन कलांमध्ये सकारात्मक ऊर्जा देण्याची भरपूर क्षमता आहे, हे त्यांनी आवर्जून नमूद केले.

Chandigarh Unique Society of Artists members painted aprons to motivate people for Covid vaccination.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात