महाराष्ट्राला रिलायन्सचा प्राणवायू, जामनगर प्रकल्पातून मिळणार १०० मेट्रिक टन ऑक्सीजन


कोरोनारुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे महाराष्ट्राला ऑक्सीजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विनंतीनंतर रिलायन्सच्या जामनगर येथील प्रकल्पातून महाराष्ट्राला १०० मेट्रिक टन ऑक्सीजन पुरवठा होणार आहे. Maharashtra will get 100 metric tons of oxygen from Reliance’s oxygen, Jamnagar project


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनारुग्णांच्या वाढत्या संख्येमुळेमहाराष्ट्रात ऑक्सीजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विनंतीनंतर रिलायन्सच्या जामनगर येथील प्रकल्पातूनमहाराष्ट्राला १०० मेट्रिक टन ऑक्सीजन पुरवठा होणार आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सध्या असलेली वाढती मागणी लक्षात घेता रिलायन्स कंपनीला वाढीव ऑक्सीजन देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार रिलायन्सच्या जामनगर प्लांट मधून महाराष्ट्रासाठी १०० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सीजन पुरवण्यात येणार आहे.



गेल्या काही दिवसांत राज्याच्या अनेक भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यासोबतच रुग्णांना ऑक्सीजन पुरवण्यासाठी ऑक्सीजनची मागणीही प्रचंड वाढली आहे. मागणी आणि पुरवठा यातील तफावत दूर करण्यासाठी नक्की काय करता येईल, याचा आढावा एकनाथ शिंदे यांनी घेतला. रायगडमधील लिंडे कंपनीकडून सध्या मुंबई, ठाणे,रायगड, पालघर यांच्यासह पुणे, नगर, औरंगाबाद येथेही आॅक्सिजन पुरवठा होतो. ही कंपनी सध्या आपल्या पूर्ण क्षमतेने २३० मेट्रिक टन ऑक्सीजन तयार करत आहे.

ऑक्सीजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी वितरणाचे विभागवार योग्य नियोजन करणे, मिळणाऱ्या ऑक्सीजनचे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या माध्यमातून नियोजन करणे, ऑक्सीजन पुरवणाऱ्या ट्रकना काही विशिष्ट भागातून जाताना सोबत पोलिस संरक्षण देणे, ऑक्सीजन पुरवठा करणाºया कंपनीच्या चालकांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांचा कोरोना योद्धे म्हणून समावेश करुन त्यातील ४५ वर्षावरील चालकांचे तत्काळ लसीकरण पूर्ण करणे याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयाना ज्या छोट्या पुरवठा धारकाकडून ऑक्सीजन पुरवठा होतो, त्यांच्या स्टोरेज आणि पुरवठा क्षमतेत वाढ करण्याचा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. याशिवाय यापुढे ऑक्सीजनप्रमाणेच नायट्रोजन पुरवठा करणारे छोटे टँकरही ऑक्सीजन पुरवठ्यासाठी वापरण्याची मुभा शासनाने दिली आहे. त्याद्वारे छोट्या खासगी रुग्णालयाना ऑक्सीजन पुरवठा करण्यात येणार आहे.

Maharashtra will get 100 metric tons of oxygen from Reliance’s oxygen, Jamnagar project


महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात