वृत्तसंस्था
चंदीगड : मोहालीच्या चंदीगड विद्यापीठातील एमएमएस व्हिडिओ लीक प्रकरणात लष्कराचा एक सैनिक सामील असल्याचे आढळून आले, त्याला पंजाब पोलिसांनी अटक केली. भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. ते म्हणतात की, भारतीय सैन्य अशा वर्तन आणि कृतीसाठी शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारते.Chandigarh MMS case: Indian Army announced its position regarding the accused jawan regarding the Chandigarh incident
या प्रकरणी भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने अधिकृत वक्तव्य समोर आले आहे. ते म्हणाले की, लष्कर अशा प्रकरणांमध्ये शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबते. तसेच, खटला जलदगतीने पूर्ण करण्यासाठी पोलिसांना मदत करत राहणार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी लष्कराच्या जवानावर विद्यापीठातील मुलीला ब्लॅकमेल करून इतर मुलींच्या अश्लील व्हिडिओंची मागणी केल्याचा आरोप आहे.
लष्कराचा जवान आरोपी
लष्कराला ही माहिती मिळताच त्यांनी तत्काळ पंजाब पोलीस आणि अरुणाचल प्रदेशला आवश्यक ते सर्व सहकार्य केले आणि या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आरोपी सैनिकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर विद्यापीठातील एका मुलीला ब्लॅकमेल करून इतर मुलींच्या अश्लील व्हिडिओंची मागणी केल्याचा आरोप होता.
आरोपी जवान संजीव सिंगची पोस्टिंग अरुणाचल प्रदेशातील इटानगरजवळच्या परिसरात होती. हा जवान जम्मू-काश्मीरचा रहिवासी आहे. आरोपी तरुणीच्या जुन्या मित्राने तिचा अश्लील व्हिडिओ या जवानाकडे आणला होता, तो लीक करण्याची धमकी देत लष्कराचा जवान तिला इतर मुलींचे व्हिडिओ बनवण्यास भाग पाडत होता. याआधी पंजाब पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली होती, त्यात व्हिडिओ बनवणाऱ्या मुलीचाही समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App