शी जिनपिंग नजरकैदेत?; चीनमधील लष्करी उठावामागे हू जिंताओ – वेन जियाबाओ?


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : एका बाजूला चीनचे सर्वेसर्वा राष्ट्राध्यक्ष शी जिंगपिंग उजबेकिस्तानातील समरकंद येथे शांघाय सहयोगी संघटनेच्या बैठकीत गेले असताना दुसरीकडे चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत शी जिंगपिंग यांना सेना दलाच्या प्रमुख पदावरून हटवण्यात आले, तसेच बीजिंगमध्ये परतताच शी जिंगपिंग यांना विमानतळातच ताब्यात घेऊन घरातच नजरकैदेत ठेवण्यात आल्याच्या बातम्या आहेत. इतकेच नाही तर चीनमध्ये लष्करी उठाव झाला असून त्या उठावा मागे माजी अध्यक्ष हू जिंताओ आणि माजी पंतप्रधान वेन जियाबाओ हे नेते असल्याचाही बातम्या आहेत. Xi Jinping under house arrest

 

या बातम्या शनिवार, 24 सप्टेंबर 2022 रोजी जगभरातील सोशल मीडियावर वणव्यासारख्या पसरल्या आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली आहे. मात्र, चीनमधील सरकारी माध्यमांनी या बातम्यांना कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे ही अफवाही असू शकते, असे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक सांगत आहेत.

 सुब्रह्मण्यम स्वामींचे ट्विट

मात्र या बातम्यांवर भाजपाचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये स्वामी यांनी, एक ताजी अफवा तपासण्याची आवश्यकता आहे. शी जिनपिंग यांना बीजिंगमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे का? शी जिनपिंग नुकतेच समरकंदमध्ये होते, तेव्हा असे मानले जाते की, चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी त्यांना पक्षाच्या लष्करी प्रमुख पदावरून हटवले. त्यानंतर त्यांना अटक झाली. अशा स्थितीत अफवांचा फेरा सुरूच आहे.

तर चीनमधील मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर झेन्ग यांनीही यासंबंधी ट्विट करत व्हिडिओ व्हायरल केला आहे. झेंग यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, चीनची लष्करी वाहने 22 सप्टेंबर रोजी बीजिंगकडे जात आहेत. बीजिंगजवळील हुआनलाई काउंटीपासून सुरू होणारी आणि हेबेई प्रांतातील झांगजियाकौ शहरात समाप्त होणार त्यांचा हा प्रवास ८० किलोमीटरचा आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शी जिंगपिंग यांना लष्कराच्या प्रमुख पदावरून हटवले असल्याची अफवा पसरत आहे. तसेच त्यांना अटकही करण्यात आली आहे.

शी जिनपिंग यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याच्या अफवा चीनशी जोडलेल्या अनेक सोशल मीडिया अकाउंट्सनी चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ आणि माजी पंतप्रधान वेन जियाबाओ यांनी सॉन्ग पिंग यांना सेंट्रल गार्ड ब्युरोची जबाबदारी स्वीकारण्यासाठी राजी केल्याचेही म्हटले आहे. तसेच चीनचे लष्कर प्रमुख ली क्वामिंग हेही चीनचे राष्ट्राध्यक्ष होण्याच्या तयारीत असल्याची अफवा सोशल मीडियात पसरत आहे. शी जिनपिंग समरकंदहून परतले तेव्हा त्यांना 16 सप्टेंबर रोजी विमानतळावरूनच ताब्यात घेण्यात आले होते. चीनमधील अनेक विमान उड्डाणे रद्द झाल्याचा दावा केला जात आहे.

चीनमधील लष्करी उठावाच्या या बातम्या बाबत चिनी सरकारी माध्यमांनी अधिकृतरित्या काही खुलासा केल्यासच त्यामध्ये स्पष्टता येऊ शकेल.

Xi Jinping under house arrest

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण