नेहरू – वाजपेयींकडे काश्मीरसाठी स्वतंत्र दृष्टी होती; मोदी सरकार हिंदू- मुस्लिमांमध्ये फूट पाडतेय; मेहबूबांचा वार

वृत्तसंस्था

श्रीनगर : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे जम्मू – काश्मीरच्या विकासासाठी स्वतंत्र दृष्टी होती. परंतु सध्याचे केंद्रातले सरकार जम्मू -काश्मीरमध्ये हिंदू – मुसलमानांमध्ये फूट पाडते आहे. इतकेच नाही, तर त्यांच्यासाठी शीख समाज म्हणजे खलिस्तानीआहे. मुसलमानांना ते पाकिस्तानी म्हणत आहेत आणि भाजपवाले एकटेच स्वतःला हिंदुस्तानी म्हणवून घेत आहेत, असा गंभीर आरोप जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पी्डीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे. Centre talk about Taliban, Afghanistan but not about farmers, unemployment PDP chief Mehboba Mufti

 

केंद्रातील मोदी सरकारवर त्यांनी चौफेर टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघांची फेररचना केवळ नावाला केली आहे. त्यांनी फक्त नावे बदलली आहेत. परंतु शाळा कॉलेज यांची नावे बदलून तिथल्या विद्यार्थ्यांना रोजगार देता येणार नाही. नुसती नामांतरे करून जम्मू-काश्मीरमधील बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. केंद्र सरकार या गंभीर प्रश्नावर काही बोलायला तयार नाही, असा आरोपही त्यांनी केला.

भाजपचे नेते मुसलमानांना पाकिस्तानी म्हणतात, तर शिखांना खलिस्तानी म्हणतात. जणू काही ते एकटेच हिंदुस्तानी आहेत. परंतु आम्ही आमच्यावरचे असले गैरआरोप सहन करणार नाही, असा इशाराही मेहबूबा मुक्ती यांनी दिला.

Centre talk about Taliban, Afghanistan but not about farmers, unemployment PDP chief Mehboba Mufti

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात