Northeastern States Boundaries Dispute : केंद्र सरकारने ईशान्येकडील राज्यांचा सीमावाद उपग्रह मॅपिंगद्वारे सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मॅपिंगचे काम नॉर्थ ईस्टर्न स्पेस अॅप्लिकेशन सेंटर (एनईएसएसी), अंतराळ विभाग (डीओएस) आणि ईशान्य परिषद (एनईसी) यांना देण्यात आले आहे. Central govt to Solve Northeastern States Boundaries Dispute by Satellite Imaging No Plans For CBI Probe
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने ईशान्येकडील राज्यांचा सीमावाद उपग्रह मॅपिंगद्वारे सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मॅपिंगचे काम नॉर्थ ईस्टर्न स्पेस अॅप्लिकेशन सेंटर (एनईएसएसी), अंतराळ विभाग (डीओएस) आणि ईशान्य परिषद (एनईसी) यांना देण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही महिन्यांपूर्वी सॅटेलाइट मॅपिंगद्वारे राज्यांच्या सीमांचे सीमांकन करण्याची सूचना केली होती. शहा यांनी ईशान्येकडील सीमा आणि जंगलांचे मॅपिंग करण्यासाठी NESACची मदत घेण्याविषयी म्हटले होते. शिलाँग स्थित NESAC आधीच या क्षेत्रात पूर व्यवस्थापनासाठी अंतराळ तंत्रज्ञान वापरत आहे.
अधिकारी म्हणाले की, जर सीमांचे विभाजन शास्त्रीय पद्धतीने केले गेले, तर त्रुटीला वाव राहणार नाही. राज्येही ते स्वीकारण्यास तयार असतील. एकदा सॅटेलाईट मॅपिंग झाले की ईशान्येकडील राज्यांच्या सीमा निश्चित होतील आणि वाद कायमचा संपेल.
वादग्रस्त आसाम-मिझोरम सीमेवर झालेल्या हिंसाचारात 5 आसाम पोलिस कर्मचाऱ्यांसह 6 जण मारले गेले. 50 हून अधिक जखमी झाले. या हिंसाचाराने संपूर्ण देशाचे लक्ष ईशान्येकडील दोन राज्यांमधील सीमा वादाकडे वेधले. आसामचा वाद केवळ मिझोरामशी नाही, तर सहाही राज्यांशी आहे ज्यांच्याशी सीमा लागून आहेत. हिंसक चकमकीनंतर दोन्ही राज्यांनी एकमेकांवर बेकायदा अतिक्रमणाचा आरोप केला आहे.
त्याचबरोबर आसाम-मिझोराम सीमेवरील चकमकींची सीबीआय चौकशी करण्याची कोणतीही योजना नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. हा वाद चर्चेद्वारे शांततेच्या वातावरणात सोडवला जाईल. दोन वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, केंद्र सरकार असा कोणताही निर्णय घेऊ इच्छित नाही ज्यामुळे तेथील परिस्थिती बिघडेल.
ते म्हणाले की, गृहमंत्री शाह आसाम आणि मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांच्या सतत संपर्कात आहेत (हिमंत बिस्वा सरमा, जोरामथंगा). त्याचबरोबर जोरमथंगा यांनी म्हटले आहे की, ईशान्य भारत नेहमीच एक असेल. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा हे त्यांच्या भावासारखे आहेत आणि ते वाद शांततेने मिटवतील.
Central govt to Solve Northeastern States Boundaries Dispute by Satellite Imaging No Plans For CBI Probe
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App