वृत्तसंस्था
हैदराबाद : भारताची सुपरस्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने भारतासाठी टोकियो ऑलिंपिकमध्ये ब्राँझ मेडल जिंकल्यावर तिचे वडील पी. व्ही. रमण यांनी मिश्किल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ती तीन ऑगस्टला भारतात येईल. त्यानंतर ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत आईस्क्रीम खाऊ शकेल, असे रमण म्हणालेत. Indian Badminton Chief National Coach P Gopichand in a statement congratulated “awesome” PV Sindhu on her 2nd successive Olympics medal.
टोकियो ऑलिम्पिकला रवाना होण्यापूर्वी सर्व खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन संवाद साधला होता. त्यावेळी सिंधूला त्यांनी तुझ्यावर कोचने कोणती बंधने घतली आहेत?, असा मिस्कील सवाल केला होता. तेव्हा ती आईस्क्रीम किंवा जंक फूड खाता येत नाही असे गमतीने म्हणाली होती. त्यावेळी पंतप्रधानांनी तू ऑलिंपिक मेडल जिंकून आल्यावर दिल्लीत ये. आपण एकत्र आईस्क्रीम खाऊ, असे आश्वासन दिले होते. हाच धागा पकडून सिंधूचे वडील रमण यांनी ती आता पंतप्रधानांबरोबर आईस्क्रीम होऊ शकेल, अशी मिश्किल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Indian Badminton Chief National Coach P Gopichand in a statement congratulated "awesome" PV Sindhu on her 2nd successive Olympics medal. "It is all due to the hard work by her, team of coaches & support staff. I also want to thank Sports Ministry, SAI & BAI," he said pic.twitter.com/hEhIRWgLpZ — ANI (@ANI) August 1, 2021
Indian Badminton Chief National Coach P Gopichand in a statement congratulated "awesome" PV Sindhu on her 2nd successive Olympics medal. "It is all due to the hard work by her, team of coaches & support staff. I also want to thank Sports Ministry, SAI & BAI," he said pic.twitter.com/hEhIRWgLpZ
— ANI (@ANI) August 1, 2021
कालच्या गेम नंतर सिंधू थोडी निराश होती परंतु तो गेम विसरून आज नवा आक्रमक खेळ कर, असे आम्ही दोघांनी तिला सांगितले होते. ती आक्रमक खेळून जिंकली. सगळ्या देशवासीयांनी तिच्यासाठी प्रार्थना केल्या. मिडियाने तिला प्रोत्साहन दिले. त्यामुळे ती भारतासाठी पदक जिंकू शकली, अशा भावना रमण यांनी व्यक्त केल्या.
I think she's coming on Aug 3. I'm planning to go to Delhi. We have to get as many medals as we can for country at Olympics. PM encouraged her & told Sindhu that we'll eat ice-cream together after returning from Tokyo. Now, she'll eat ice-cream with PM: PV Ramana, Sindhu's father pic.twitter.com/5tChxNm3SG — ANI (@ANI) August 1, 2021
I think she's coming on Aug 3. I'm planning to go to Delhi. We have to get as many medals as we can for country at Olympics. PM encouraged her & told Sindhu that we'll eat ice-cream together after returning from Tokyo. Now, she'll eat ice-cream with PM: PV Ramana, Sindhu's father pic.twitter.com/5tChxNm3SG
सिंधूचे भारतीय कोच पुलेला गोपीचंद यांनीही सिंधूच्या यशाबद्दल तिचे विशेष अभिनंदन केले आहे. बॅडमिंटन विषयी तिची असणारी आस्था आणि प्रचंड मेहनत करण्याची तिची तयारी यामुळे तिला दोन ऑलिम्पिकमध्ये पदके मिळाली, अशा भावना पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केल्या. सिंधूचे परदेशी कोच पार्क यांचे तिच्या वडिलांनी आभार मानले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App