सणासुदीच्या दिवसांमध्ये सामान्य ग्राहकांना दिलासा; कच्च्या खाद्यतेलांचे सीमा शुल्क केंद्राकडून रद्द

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दसरा दिवाळी सारख्या ऐन सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्य ग्राहकाला दिलासा देणारे पाऊल केंद्र सरकारने उचलले असून सर्व प्रकारच्या कच्च्या खाद्य तेलांच्या आयातीचे सीमाशुल्क घटविण्यात आले आहे. याचा परिणाम खाद्यतेलाच्या सर्वसामान्य विक्रीवर सकारात्मक होऊन त्याचे भाव कमी होतील, अशी अपेक्षा आहे. Central govt scraps customs duty on crude varieties of palm, soybean, and sunflower oil till March 31, 2022, tweeted Union Minister Piyush Goyal yesterdayकेंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. पाम तेल, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल आणि त्याच्या बिया यांच्यावरचे आयात शुल्क 17 टक्क्यांवरून शून्य टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये या तेलांच्या किमती कमी होण्यास मदत होईल याच काळात या तेलांचा वापर आणि खरेदी वाढते त्यामुळे व्यापाऱ्यांची त्यांचा साठा करून ठेवण्याची प्रवृत्ती देखील आहे. तिला आळा बसण्यासाठी देखील केंद्र सरकारने उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांपैकी एक महत्त्वाची उपाययोजना म्हणून हे सीमाशुल्क घटविण्यात आले आहे.

यंदाच्या वर्षात पाम लागवडीचे क्षेत्र 28 लाख हेक्‍टरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट देखील केंद्र सरकारने डोळ्यासमोर ठेवले आहे. यातून देशांतर्गत पाम तेलाचे उत्पादन वाढून त्याच्या किमती नियंत्रणात राहण्याचे अपेक्षा आहे.

Central govt scraps customs duty on crude varieties of palm, soybean, and sunflower oil till March 31, 2022, tweeted Union Minister Piyush Goyal yesterday

महत्त्वाच्या बातम्या