State Womens Commision : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील प्रलंबित महिला आयोगावर अध्यक्ष नियुक्तीचा निर्णय नुकताच घेतल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकले. यानुसार राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांची महिला आयोगावर अध्यक्ष म्हणून नेमणूक होणार असल्याचे समोर आले आहे. या नियुक्तीबरोबरच आता विरोधकांकडून टीकाही सुरू झाली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करून या प्रस्तावित नियुक्तीवर आक्षेप घेत कडाडून टीका केली आहे. BJP Leader chitra wagh Criticized NCP Leader Rupali Wagh Over State Womens Commision Presidency
प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील प्रलंबित महिला आयोगावर अध्यक्ष नियुक्तीचा निर्णय नुकताच घेतल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकले. यानुसार राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांची महिला आयोगावर अध्यक्ष म्हणून नेमणूक होणार असल्याचे समोर आले आहे. या नियुक्तीबरोबरच आता विरोधकांकडून टीकाही सुरू झाली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करून या प्रस्तावित नियुक्तीवर आक्षेप घेत कडाडून टीका केली आहे.
राज्यात मागच्या काही दिवसांपासून महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. मुंबई, पुणे, नागपूर तसेच विविध जिल्ह्यांत मागच्या महिन्या- दीड महिन्यात महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या. तेव्हापासूनच राज्यात महिला आयोगावर अध्यक्ष नसल्याबाबत टीका सुरू होती. बुधवारी (13 ऑक्टोबर) राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित झाली आहे. मागच्या दीड वर्षापासून हे पद रिक्त आहे.
महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल — Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) October 14, 2021
महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे
अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका
अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल
— Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) October 14, 2021
या नियुक्तीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कडाडून टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, “महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल.”
यापूर्वीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंती असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर 2019 मध्ये सरकार बदलले आणि दीड वर्षापासून आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रूपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाची संधी मिळाली. चाकणकर आणि वाघ या एकेकाळच्या जीवलग मैत्रिणी होत्या. मात्र, चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेल्या. त्यापूर्वी त्या राष्ट्रवादीच्या प्रदेश महिला अध्यक्षा होत्या. तर रूपाली चाकणकर या पुणे शहरातील पक्षाच्या महिला अध्यक्षा होत्या. राष्ट्रवादीमध्ये असताना दोघींमध्ये त्यावेळी चांगलेच ट्यूनिंग होते. तथापि, चित्रा वाघांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर या दोघींमध्येही अंतर वाढत गेले. दोघींमध्येही राजकीय संघर्ष सुरू झाला आणि तो वाढत गेला. तथापि, चाकणकरांकडून चित्रा वाघ यांच्या टीकेवर काय उत्तर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
BJP Leader chitra wagh Criticized NCP Leader Rupali Wagh Over State Womens Commision Presidency
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App