जम्मू काश्मीर मधील कलम 370 रद्द केल्यानंतर रोजगारनिर्मिती, राज्यात आरोग्याच्या सोयीसुविधा पुरविण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात केंद्र सरकार अपयशी : काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद


विशेष प्रतिनिधी

जम्मू : 2019 मध्ये जम्मू काश्मीरला राज्यातील कलम 370 रद्द करण्यात आला होता. यानंतर प्रथमच अमित शहा तीन दिवसांच्या भेटीसाठी जम्मू काश्मीर दौऱ्यावर आले आहेत. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी एएनआय सोबत बोलताना म्हटले आहे, जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करण्यापूर्वी चांगले दिवस होते. केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने जम्मू काश्मीरमध्ये बरेच बदल घडवून आणण्याची आश्वासने दिली होती. परंतु त्यापैकी कोणतीही गोष्ट सत्यात उतरलेली नाहीये. केंद्राने रोजगारनिर्मिती, राज्यात आरोग्याच्या सोयीसुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यांपैकी काहीही रियलमध्ये घडून आलेले नाहीये. असे नबी यांनी यावेळी म्हटले आहे.

Central government fails to deliver on promises of job creation, health facilities in state after repeal of Section 370 in Jammu and Kashmir: Congress leader Ghulam Nabi Azad

पुढे ते म्हणतात, रुग्णालये व इतर सुविधा पुरवल्या जातील, रोजगार निर्मिती केली जाईल असे आश्वासन सरकारकडून करण्यात आले होते. जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये मुख्यमंत्री होते त्या वेळी परिस्थिती बरीच चांगली होती. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याचे परिणाम लोकांना जाणवत आहेत.


‘मी हिंदुस्तानी मुसलमान असल्याचा अभिमान, पाकिस्तानात कधी गेलो नाही हे भाग्यच’, निरोपावेळी गुलाम नबी आझादांचे भावनिक वक्तव्य


राज्याचे दोन भाग झाल्यामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील विधानसभा बरखास्त झाल्यापासून आमचा मोठा पराभव झाला आहे. असे यावेळी गुलाम नबी आझाद यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले आहे.

Central government fails to deliver on promises of job creation, health facilities in state after repeal of Section 370 in Jammu and Kashmir: Congress leader Ghulam Nabi Azad

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात