विशेष प्रतिनिधी
देगलूर : मुद्दा कोणताही असो सत्ताधारी पक्ष आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. राज्यातल्या आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर हे राजकारण चांगलंच तापलेले आहे. नांदेड जिल्ह्यात कुंडलवाडी इथे देगलूर पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना महाविकास आघाडीवर चांगलीच टीका केली आहे.
‘… then allow farmers to plant herbal tobacco too’: Devendra Fadnavis
‘महाविकास आघाडीतील लोक कशामध्ये भ्रष्टाचार करतील याचा काही नेम नाही. जमेल त्यामध्ये ते खात आहेत. असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे. पुढे ते म्हणतात, हे सरकार इतक लबाड आहे की काहीही झाले तरी केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मला तर असं वाटतंय, त्यांच्या बायकोने मारलं तरीही सांगतील की केंद्र सरकारचा हात आहे. असे लबाड लोक इथे आहेत.’ अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडी मधील नेत्यांवर केली आहे.
वचन दिले होते तर शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे होते ना…!!; फडणवीसांचे टोले
अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर फडणवीस यांनी अप्रत्यक्षरीत्या टीका केली आहे. टीका करताना ते म्हणतात, एका मंत्र्याचा जावई गांजा विकताना आढळून आला. पण मंत्री म्हणतात कि ती हर्बल तंबाखू आहे. मग आमचे सदाभाऊ खोत म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. तुमचा मंत्री हर्बल तंबाखू पिकवु शकतात तर शेतकऱ्यालाही हर्बल तंबाखू लावायची परवानगी द्या. म्हणजे शेतकर्यांना चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. असे खोचक विधान यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App