अमेरिकेतही भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा, न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर फडकला तिरंगा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. हा ध्वजारोहण कार्यक्रम यूएसमध्ये फेडरेशन ऑफ इंडिया आणि न्यूयॉर्क मेट्रोपॉलिटन रीजन यांनी आयोजित केला होता.Celebrating the Amrit Mahotsav of India’s independence in America too, the tricolor was hoisted at New York’s Times Square

यावेळी भारतीय महावाणिज्य दूत रणधीर जसवाल यांनी तिरंगा फडकवला. या कार्यक्रमाला न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्सदेखील उपस्थित होते. प्रसिद्ध संगीतकार देवी श्री प्रसाद आणि शंकर महादेवन यांनीही न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याच्या या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. शंकर महादेवन यांनी ‘ए वतन मेरे आबाद रहे तू..’ हे देशभक्तिपर गीत गायले. घटनास्थळी उपस्थित असलेले भारतीय शंकर महादेवन यांच्या गायनाला साथ देत होते. यावेळी टाइम्स स्क्वेअर दुमदुमून गेला होता.



कार्यक्रमाची सांगता भारतीय राष्ट्रगीताने

जगभरात राहणारे परदेशी भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करतात. काल लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जगभरात पसरलेल्या भारतीयांना त्यांच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता भारतीय राष्ट्रगीताने झाली. देवी श्री प्रसाद यांनी भारताचे राष्ट्रगीत गायले. न्यूयॉर्कमधील या प्रसिद्ध ठिकाणी तिरंगा फडकवण्यात आला तेव्हा तो पाहण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली होती.

कार्यक्रमानंतर, एम्पायर स्टार बिल्डिंग दिवसा तिरंग्याच्या दिव्यांनी उजळली आणि अमेरिकेच्या वेळेनुसार संध्याकाळी हवाई प्रदर्शनाद्वारे तिरंगा हडसन नदीच्या 220 फूट उंचीवर प्रदर्शित झाला, असे अहवालात म्हटले आहे. 15 ऑगस्ट 2020 रोजी न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर पहिल्यांदा तिरंगा फडकवण्यात आला होता.

कॅनडामधील भारतीय प्रवासींनी मोफत अन्न वाटप केले

केवळ अमेरिकेतच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. कॅनडातील हिंदू आणि शीख स्थलांतरितांनी टोरंटोमधील लोकांना मोफत अन्न वाटून स्वातंत्र्य दिन साजरा केला.

Celebrating the Amrit Mahotsav of India’s independence in America too, the tricolor was hoisted at New York’s Times Square

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात