CDS Bipin Rawat Funeral : देशाच्या हिरोला साश्रुनयनांनी मुलींनी दिला निरोप, थोड्याच वेळात अंत्यसंस्कार, १७ तोफा – ८०० जवान देणार सलामी


सीडीएस बिपिन रावत यांच्यासह तामिळनाडू हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेल्या सर्व 13 जणांना आज अंतिम निरोप देण्यात येत आहे. तत्पूर्वी, जनरल बिपिन रावत यांचे पार्थिव शुक्रवारी बेस हॉस्पिटलमधून त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सर्व नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. सीडीएस बिपिन रावत आणि मधुलिका रावत यांच्या मुली कृतिका आणि तारिणी यांनी त्यांच्या पालकांना श्रद्धांजली वाहिली. दुपारी 3.30 वाजता दिल्ली कॅंट ब्रार चौकात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नेण्यात येणार आहे. 4.45 वाजता 17 तोफांची सलामी देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी 800 सैनिक येथे उपस्थित राहणार आहेत. CDS Bipin Rawat Funeral Daughters bid farewell with moist eyes Funeral in a while, 17 guns 800 jawans will salute


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : CDS बिपिन रावत यांच्यासह तामिळनाडू हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेल्या सर्व 13 जणांना आज अंतिम निरोप देण्यात येत आहे. तत्पूर्वी, जनरल बिपिन रावत यांचे पार्थिव शुक्रवारी बेस हॉस्पिटलमधून त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सर्व नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. सीडीएस बिपिन रावत आणि मधुलिका रावत यांच्या मुली कृतिका आणि तारिणी यांनी त्यांच्या पालकांना श्रद्धांजली वाहिली. दुपारी 3.30 वाजता दिल्ली कॅंट ब्रार चौकात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नेण्यात येणार आहे. 4.45 वाजता 17 तोफांची सलामी देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी 800 सैनिक येथे उपस्थित राहणार आहेत.

केंद्रीय मंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, मनसुख मंडाविया, स्मृती इराणी आणि सर्बानंद सोनोवाल यांनी सीडीएस जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहिली.

दुपारी ४.४५ वाजता अंत्यसंस्कार

दुपारी ३.३० वाजता बिपिन रावत यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानापासून बेरार चौकात नेण्यात येणार आहे. दुपारी 3.30-4 पर्यंत लोक श्रद्धांजली अर्पण करतील. व्हीव्हीआयपी 4.15 पर्यंत श्रद्धांजली वाहतील. दुपारी 4.15 ते 4.30 या वेळेत कौटुंबिक विधी होतील. आणि नंतर सीडीएस बिपिन रावत यांच्यावर दुपारी ४.४५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

CDS Bipin Rawat Funeral Daughters bid farewell with moist eyes Funeral in a while, 17 guns 800 jawans will salute

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात