‘सीबीएसई’ च्या बोर्डाच्या परीक्षा प्रसंगी ऑनलाइन घेण्याचा पर्याय


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात सीबीएसईने २०२१ २२ या शैक्षणिक वर्षासाठी दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा प्रसंगी ऑनलाइन घेण्यावर भर दिल्याचे वृत्त आहे. मात्र, परिस्थितीनुसार त्या ऑनलाइन किंवा ऑफलाईन सुद्धा त्या होऊ शकतात. CBSE Board Examinations Option to take the occasion online

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ‘सीबीएसई’ने परिक्षेबाबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यात इयत्ता दहावी व बारावीच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डांची परीक्षाही प्रत्येकी ५० टक्के अभ्यासक्रमासह दोन टप्प्यांत दोन सत्रात घेतली जाणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा सोमवारी करण्यात आली.



पहिल्या सत्रात ४ ते ८ आठवड्यात सोयीनुसार परीक्षा नियोजन केले असून ९० मिनिटात multipal choice question पेपर मुलांना सोडवायला लागतील. दुसऱ्या स्त्राच्या अखेरीस १२० मिनिटासाठी पहिल्या स्त्राप्रमाणे परीक्षा घेण्यात येईल. मात्र, त्यामध्ये पहिल्या सत्रातील अभ्यासक्रमाचा भाग असणार नाही.

अभ्यासक्रमाचे विभाजन दोन समान भागात केले आहे. कोरोनाचे संक्रमण कमी झाले तर शाळा आणि परीक्षा केंद्रावर नेहमीप्रमाणे परीक्षा होतील. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये शाळा सुरु नसतील तेव्हा विद्यार्थी ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देऊ शकतो. त्यासाठी विद्यार्थावर कोणताही दबाव आणला जाणार नाही. मात्र दुसऱ्या सत्रात टक्केवारी आणि चांगला निकाल लागण्यासाठी विद्यार्थावर दबाव वाढविला जाईल, असे सांगण्यात आले.

CBSE Board Examinations Option to take the occasion online

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात