WATCH : बेळगावात लाल-पिवळ्या ध्वजावरून वातावरण तंग


विशेष प्रतिनिधी

बेळगाव : बेळगाव महापालिकेसमोर लाल पिवळा ध्वज लावण्याचा पुन्हा प्रयत्न कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे वातावरण तंग बनले. The atmosphere in Belgaum is tense due to the red-yellow flag

लाल पिवळा ध्वज फडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आधीचा लाल पिवळा ध्वज खराब झाल्याचे कारण सांगून नवीन ध्वज फडकवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. अनधिकृत ध्वजावरून गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात तणावाचं वातावरण आहे.

विशेष म्हणजे काही वर्षा पूर्वी महापालिकेच्या आवारात भगवा ध्वज फडकत होता. अनेक वर्षे फडकत असलेला हा भगवा ध्वज कर्नाटकी सरकारने काढून टाकला. तेव्हा तमाम मराठी बांधव हळहळले होते. ‘भगव्या आम्हाला माफ कर’ अशी आर्त किंकाळी फोडण्यात आली. पण, पोकळ किंकाळ्याचा तसा परिणाम कोणताच झाला नाही. एकदा उतरलेला भगवा ध्वज पुन्हा कधीच पालिकेसमोर फडकला नाही. आता तर लाल- पिवळा ध्वज फडकविला जाण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

  • बेळगावात लाल पिवळा ध्वज लावण्याचे प्रयत्न
  • कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांचे कृत्य
  • पालिकेसमोरध्वज लावण्यावरून पुन्हा तणाव
  • ध्वज फडकविण्याचा प्रयत्न करणारे ताब्यात
  • पूर्वीचा ध्वज खराब झाल्याचे कारण
  • महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात ध्वजावरून तणाव
  • भगवा ध्वज अनेक वर्षांपूर्वी हटविण्यात आला होता

The atmosphere in Belgaum is tense due to the red-yellow flag

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण