सीबीएसई बारावीचा निकाल ३१ जुलैला लागणार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सीबीएसईच्या बारावी बोर्डाचा निकाल ३१ जुलैला तर दहावीचा २० जुलैला रोजी जाहीर करण्यात येईल, असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता जाहीर करण्यात येणाऱ्या निकालाचे प्रारूप तयार केले आहे.CBSC result will declares on 31 july

यानुसार विद्यार्थ्यांनी दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्षांमध्ये मिळविलेल्या गुणांच्या सरासरीवर त्यांच्या बोर्डाच्या गुणांचे मूल्यांकन करण्यात येईल.‘सीबीएसई’ने १२ सदस्यांची एक तज्ञ समिती नेमून मूल्यांकनाचे ३०: ३०: ४० अशा गुणांच्या धर्तीचे प्रारूप तयार केले आहे.ॲटर्नी जनरल के. के वेणुगोपाल यांनी आज ते न्यायालयासमोर ते सादर केले.आयसीएसई बोर्डाच्या परीक्षांचे निकाल निश्चित करताना प्रत्येक विद्यार्थ्याची गेल्या ६ वर्षांची कामगिरी गृहीत धरून त्या आधारावर त्याचा निकाल जाहीर केला जाईल,

असे केंद्र सरकारने न्यायालयात सांगितले. ‘सीबीएसई’च्या वतीने नवे मूल्यांकन निकष लवकरच अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात येतील.

CBSC result will declares on 31 july

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती