Budget Session : पश्चिम बंगाल विधानसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच ममता सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष पेटला आहे. याची झलक आज दुपारी 2 वाजता दिसण्याची शक्यता आहे. बंगाल विधानसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशन दुपारी दोन वाजता राज्यपाल जगदीप धनखड यांच्या अभिभाषणाने सुरू होईल. पण सरकारने लेखी जे काही पाठवले आहे, ते नक्की वाचणार नाही, असे धनखड यांनी स्पष्ट केले आहे. budget session west bengal assembly session to begin today likely to be stormy Governor Dhankar Vs CM Mamata Banerjee
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच ममता सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष पेटला आहे. याची झलक आज दुपारी 2 वाजता दिसण्याची शक्यता आहे. बंगाल विधानसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशन दुपारी दोन वाजता राज्यपाल जगदीप धनखड यांच्या अभिभाषणाने सुरू होईल. पण सरकारने लेखी जे काही पाठवले आहे, ते नक्की वाचणार नाही, असे धनखड यांनी स्पष्ट केले आहे.
नियमांनुसार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरू होते. हे अभिभाषण राज्य सरकारने तयार केले असून ते राज्यपालांना वाचनासाठी देण्यात आले आहे. सहसा अभिभाषणात सरकारच्या कामाचे वर्णन आणि आगामी योजनांची ब्लू प्रिंट असते. परंतु राज्यपाल जगदीप धनखड यांनी अनेक वेळा ममता सरकारच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
अलीकडेच दोन्ही बाजूंमध्ये तणाव तीव्र झाला आहे. सोमवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल जगदीप धनखड यांना भ्रष्ट म्हटले होते. त्यास उत्तर म्हणून राज्यपालांनी सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळले.
राज्यपाल धनखड म्हणाले होते की, सर्व आरोप त्यांच्यावर राजकारणाच्या भावनेने प्रेरित आहेत. हे अभिभाषण नक्की वाचणार नाही असे सांगून त्यांनी सरकारला लक्ष्य करण्याचे संकेत दिले आहेत. राज्य सरकार आणि राजभवनातील दरी आणखीनच रुंदावल्याचे स्पष्ट झाले आहे.
budget session west bengal assembly session to begin today likely to be stormy Governor Dhankar Vs CM Mamata Banerjee
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App