राजस्थानातील दलित हत्येप्रकरणी काँग्रेस गप्प का?, 50 लाखांची मदत देणार का?, नक्राश्रू ढाळणे बंद करा, मायावतींचा संताप


 

राजस्थानच्या हनुमानगढमध्ये एका दलित युवकाची हत्या केल्याप्रकरणी बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) अध्यक्षा आणि यूपीच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. मायावतींनी रविवारी ट्वीट केले आणि हनुमानगडमधील घटनेवर काँग्रेस हायकमांड गप्प का, असा सवाल केला आहे. छत्तीसगड आणि पंजाबचे मुख्यमंत्री तिथे जाऊन पीडितांच्या कुटुंबीयांना 50-50 लाख रुपये देतील का, असा प्रश्नही त्यांनी केला आहे.BSP Supremo Mayawati Criticizes Congress High Commond Over Dalit murder in Rajasthan, Ask to provide Rs 50 lakh


प्रतिनिधी

लखनऊ : राजस्थानच्या हनुमानगढमध्ये एका दलित युवकाची हत्या केल्याप्रकरणी बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) अध्यक्षा आणि यूपीच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. मायावतींनी रविवारी ट्वीट केले आणि हनुमानगडमधील घटनेवर काँग्रेस हायकमांड गप्प का, असा सवाल केला आहे. छत्तीसगड आणि पंजाबचे मुख्यमंत्री तिथे जाऊन पीडितांच्या कुटुंबीयांना 50-50 लाख रुपये देतील का, असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

हनुमानगड घटनेवर काँग्रेस हायकमांड गप्प का? : मायावती

बसप प्रमुख मायावतींनी राजस्थानच्या हनुमानगढमध्ये दलित युवकाची हत्या झाल्याप्रकरणी राजस्थानच्या गेहलोत सरकारला आणि पर्यायाने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. लखीमपूर प्रकरणात काँग्रेसने ज्या प्रकारे राजकारण केले त्यावरून मायावतींनी सडकून टीका केली आहे. मायावतींनी ट्विट करून लिहिले की,

“राजस्थानच्या हनुमानगढमध्ये एका दलिताची हत्या अत्यंत दु:खद आणि निंदनीय आहे, पण काँग्रेस हायकमांड गप्प का आहे? छत्तीसगड आणि पंजाबचे मुख्यमंत्री तिथे जाऊन पीडितांच्या कुटुंबाला 50-50 लाख रुपये देतील का? बसपाला उत्तर हवे आहे, अन्यथा दलितांच्या नावाने नक्राश्रू ढाळणे बंद करा.”

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा

त्याचवेळी दुसऱ्या एका ट्विटमध्ये मायावतींनी लखीमपूर खेरी घटनेचा उल्लेख करत केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा राजीनामा मागितला आहे. तर तिथेच तिसऱ्या ट्विटमध्ये जम्मू -काश्मीरच्या घटनेचा संदर्भ देत मायावतींनी लिहिले,

“यूपीच्या लखीमपूर खेरी जघन्य घटनेत केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाचे नाव हेडलाईन्समध्ये येत असल्याने भाजप सरकारच्या कार्यशैलीवर अनेक प्रश्न उपस्थित होतात. अशा परिस्थितीत भाजपने स्वतः आपल्या मंत्र्याकडून राजीनामा घ्यावा, तरच पीडित शेतकऱ्यांना काही न्याय मिळण्याची आशा असू शकते. बसपाची ही मागणी आहे. याशिवाय जम्मू -काश्मीरमध्ये रोज दहशतवाद्यांकडून निरपराध लोकांची हत्या होणे अत्यंत दुःखद आणि लज्जास्पद आहे. केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत, बसपाची ही मागणी आहे.”

काय घडले राजस्थानात?

राजस्थानच्या हनुमानगडमधील पिलीबंगा परिसरातील प्रेमपुरा गावात, काही समाजकंटकांनी अनुसूचित जातीच्या तरुणाला मारहाण केली. प्रेमप्रकरणातील वादातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. मृत तरुण तेथे राहणाऱ्या घटस्फोटीत महिलेला सतत फोन करत होता. कुटुंबाने यावर अनेक वेळा आक्षेप घेतला, पण तक्रारीचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. यामुळे गुरुवारी सायंकाळी काही लोकांनी त्याला शेतात नेऊन बेदम मारहाण केली, त्यातच त्याचा मृत्यू झाला.

BSP Supremo Mayawati Criticizes Congress High Commond Over Dalit murder in Rajasthan, Ask to provide Rs 50 lakh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात