राजीनाम्यावेळी भावुक झाले येडियुरप्पा म्हणाले पक्षाची शिस्त मोडणार नाही


वृत्तसंस्था

बेंगळुरू : दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होताच बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. येडियुरप्पा यांनी भाजपा सरकारच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा निर्णय जाहीर केला. Bs Yediyurappa Resigns As Karnataka Chief Minister

येडियुरप्पा यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ सोमवारी पूर्ण झाला त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे. कर्नाटकमध्ये खांदेपालट होण्याचे संकेत अनेक दिवसांपासून वर्तवण्यात आले होते. अखेर आज येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले आहेत.पक्षश्रेष्ठींचे निर्देश मिळाल्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ. पक्षश्रेष्ठींचे निर्देश आले की तुम्हालाही त्याबाबत कळेलच, असे येडियुरप्पा यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. आपण केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय मान्य करू याचा पुनरुच्चार त्यांनी केला होता. आपण समाधानी असून पक्षाची शिस्त मोडणार नाही, असेही ते म्हणाले होते.

येडियुरप्पा आज दुपारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील. येडियुरप्पा यांनी भाजपा सरकारच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा निर्णय जाहीर केला. दुपारी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांना आपण राजीनामापत्र देणार असल्याचे येडियुरप्पा यांनी सांगितले.

बेंगळुरू येथील कर्नाटक विधान सौधा येथे येडियुरप्पा सरकारच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमाच्या वेळी भाषणादरम्यान भावूक झाले होते. ज्यावेळी कोणतीही गाडी नव्हती तेव्हा शिमोगा, शिकारीपुरा येथे काहीच कार्यकर्ते नसताना पक्ष उभा करण्यासाठी आम्ही सायकल चालवत जात असल्याची आठवण त्यांनी सांगितलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात केंद्रात पुन्हा भाजपा सत्तेवर यावी ही माझी इच्छा आहे.” असे येडियुरप्पा म्हणाले.

येडियुरप्पा यांनी चांगले काम केले आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटले आहे. मात्र, केंद्रीय संसदीय कामकाज आणि खनिकर्ममंत्री प्रल्हाद जोशी, त्याचबरोबर कर्नाटकचे मंत्री मुरुगेश निरानी यांना भाजपाश्रेष्ठींनी तातडीने दिल्लीला पाचारण केले होते. त्यामुळे आता कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी कोण असणार याबाबत दिल्लीत चर्चा सुरु असल्याचे म्हटले होते.

Bs Yediyurappa Resigns As Karnataka Chief Minister

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”