कर्नाटकात सत्तारुढ भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग, येडीयुरप्पा पुत्र दिल्लीला


वृत्तसंस्था

बंगळूर : कर्नाटकमध्ये सत्तारुढ भाजपमधे राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. प्रशासनाला गती देण्यासाठी सक्रिय नसलेल्या मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकते. मंत्रिमंडळातून वगळण्यात येणाऱ्या वरिष्ठ मंत्र्यांना पक्षात महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते. Politicis begins in Karanataka BJP

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र दिल्लीला गेले असून त्यांच्या भेटीला राजकीय महत्त्व देण्यात येत आहे. पुढील तीन महिन्यांत प्रदेश भाजपमध्ये मोठे बदल होणार असल्याचे कळते. विद्यमान नेत्यांच्या वर्तनाचा आढावा घेतला जाईल. तीन महिन्यांनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांच्यासह अनेकांची पदे बदलण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वरिष्ठ आमदारांऐवजी तरुण आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्याच्या विचारात हायकमांड आहे.



गेल्या आठवड्यापासून राज्यात नेतृत्व बदलाची चर्चा सुरु आहे. मंत्री सी.पी. योगेश्वर यांनीही अप्रत्यक्षपणे नेतृत्व बदल मान्य केले. मुख्यमंत्री येडियुरप्पा जेडीएस आणि कॉंग्रेससोबत तडजोडीचे राजकारण करीत असल्याचा आरोप मंत्री योगेश्वर यांनी केला होता. प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष व येडियुरप्पा पुत्र बी. वाय. विजयेंद्र हे आपल्या विभागात हस्तक्षेप केल्याची त्यांची अप्रत्यक्ष तक्रार आहे.

Politicis begins in Karanataka BJP

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात