अफगाणमधून २०० कुत्रे-मांजरासह माजी अधिकारी ब्रिटनमध्ये दाखल


विशेष प्रतिनिधी

लंडन – अफगाणिस्तानातून ब्रिटनचा माजी नौदल अधिकारी दहा वीस नाही तर तब्बल २०० हून अधिक कुत्रे आणि मांजर घेऊन मायदेशी परतला. या प्राण्यांसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला.पॉल पेन फारथिंग यांनी पंधरा वर्षापूर्वी अफगाणिस्तानात ब्रिटिश सैनिक म्हणून सेवा बजावलीBritish officer brings back 200 animals

त्यानंतर ‘नाउजाड’ नावाची स्वयंसेवी संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात होते. तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर फारथिंग यांनी मायदेशी येण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी अफगाणिस्तानात पाळलेल्या प्राण्यांसह देश सोडण्यासाठी मोहीम सुरू केली. यासाठी त्यांनी सोशल मीडियाची मदत घेतली आणि मुलाखती दिल्या.



फारथिंग यांच्या समर्थकांनी ब्रिटिश सरकारकडे मदत मागितली. शेवटी अफगाणिस्तानातून प्राण्यांना आणण्यासाठी ऑपरेशन आर्क असे नाव देण्यात आले. प्रत्यक्षात ते आपल्या अफगाण सहकाऱ्यांसमवेत आणि अनाथांसमवेत ब्रिटिश सैनिकांबरोबर मायदेशी येण्यास पात्र होते. परंतु त्यांनी प्राण्याशिवाय आपण मायदेशी येणार नाही, असा हट्ट धरला.

वैयक्तिकरित्या भाड्याने घेतलेल्या चार्टर प्लेनने पॉल पेन फाथरिंग हे प्राण्यांसह काबूलहून लंडनकडे रवाना झाले आणि हिथ्रो विमानतळावर उतरले. ब्रिटिश सैनिकांनी फारथिंग आणि त्यांच्या प्राण्यांना विमानापर्यंत संरक्षण दिले.

British officer brings back 200 animals

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात