दोन्ही हात नसलेल्या युवकाच्या पायावर दिली कोरानाची लस, जगातील पहिलेच उदाहरण

विशेष प्रतिनिधी

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये दोन्ही हात नसलेल्या २२ वर्षीय युवकाला कोरोना लस देण्यात आली. जन्मजात दिव्यांग असलेल्या या युवकाच्या पायाला लस दिली. जगातील हे पहिले बहुतेक पहिले उदाहरण असल्याचा दावा केला जात आहे. अलाथुरमधील प्रणव बालसुब्रमण्यमला जन्मपासूनच दोन्ही हात नाहीत. मात्र, या शारीरिक व्यंगावर मात करत त्याने कोरोना लस घेतली. Boy get vaccine at legआरोग्य कर्मचाऱ्यांनाही त्याला लस कशी द्यावी, असा प्रश्न पडला होता. मात्र, आरोग्य विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्याला पायावर लस देण्यात आली. चित्रकार असलेला बालसुब्रमण्यम चित्रे काढून उपजीविका करतो.

Boy get vaccine at leg

महत्त्वाच्या बातम्या