डीजी यात्रा योजनेत चेहराच होईल बोर्डींग पास आणि ओळखपत्र, देशातील सात विमानतळांवर हवाई वाहतूक मंत्रालयाची योजना


हवाई वाहतूक मंत्रालयाच्या नवीन योजनेंतर्गत देशातील विमानतळांवर चेहऱ्यांवरील ओळख तंत्रज्ञाना (फेशिअल रिकग्निशन सिस्टम) चा वापर सुरू करण्याची योजना आहे.Boarding pass and identity card will be the face of DG Yatra scheme, plan of Ministry at seven airports


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हवाई वाहतूक मंत्रालयाच्या नवीन योजनेंतर्गत देशातील विमानतळांवर चेहऱ्यावरील ओळख तंत्रज्ञाना (फेशिअल रिकग्निशन सिस्टम) चा वापर सुरू करण्याची योजना आहे.’डिजी यात्रा’ नावाची नावाच्या या यंत्रणेची चाचणी सुरु होणार असल्याचे कोलकाता विमानतळाने नुकतेच जाहीर केले आहे.

मार्च महिन्यात सरकारने लोकसभेत माहिती देताना सांगितले होते की, वर्षाच्या अखेरीस विमानतळांवर चेहºयावरील ओळख तंत्रज्ञानाला सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात ही सुविधा कोलकाता, वाराणसी, पुणे, विजयवाडा, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये सुरू होईल.सध्या या तंत्रज्ञानाची चाचणी देशातील वेगवेगळ्या विमानतळांवर सुरू आहे. 6 सप्टेंबर 2020 रोजी दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 3 येथे या योजनेची चाचणी घेण्यात आली. बंगळुरू आणि मुंबई विमानतळांवर यापूर्वीच हे काम सुरु झाले आहे.

जुलै 2019 मध्ये हैदराबाद विमानतळावरही याची चाचणी घेण्यात आली आहे. कोलकाता विमानतळावर लवकरच या तंत्रज्ञानाची चाचणी सुरू होणार आहे. प्रवाशांना विविध चेक पॉइंट्वर बोर्डिंग पास किंवा ओळखपत्र दाखवावे लागणार नाही.

बोर्डिंग प्रक्रियेस कमी वेळ लागेल आणि प्रवाशांना लांबलचक रांग टाळता येईल. प्रत्येक चेक पॉइंटवर फक्त प्रवाशालाच प्रवेश मिळेल.एअरपोर्ट ऑपरेटर जवळ प्रवाशांचा रिअल टाइम डेटा असेल. यामुळे पेसेंजर लोड आणि रिसोर्स प्लानिंग उत्तम होण्यास मदत होईल.

डीजीयात्रा योजनेत एकदाच आधार, पासपोर्ट किंवा इतर कोणत्याही ओळखपत्रासह डेटाबेसमध्ये आपल्या चेहऱ्यांची ओळख पटवावी लागेल. विमान वाहतूक मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून प्रवाशांना डीवाय आयडी क्रमांक तयार करावा लागणार आहे.

विमानतळावर या डीवाय आयडीचा प्रथम वापर करताना शारीरिक पडताळणी केली जाईल. यानंतर विमानाचे तिकीट काढताना प्रवाशांना हा नंबर द्यावा लागेल. जेव्हा आपण विमानतळावर पोहोचाल तेव्हा डेटाबेसमध्ये आपल्या चेहऱ्यावरील ओळखीची एंट्री मिळेल.

आपणास या सुविधेचा लाभ घ्यायचा नसेल तर विमानतळावर कागदी तिकिटे आणि ओळखपत्र दाखवून बोर्डिंगची सुविधा अबाधित राहील.दुबईच्या विमानतळावर या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. ज्या प्रवाशांनी यात नोंदणी केली आहे

त्यांना विमानतळाच्या वेगवेगळ्या गेटवर कागदपत्रे दाखवावी लागणार नाहीत. त्यांना फक्त पाच मिनिटांसाठी वेगळ्या गेटवर असलेल्या कॅमेऱ्याकडे पहावे लागेल आणि त्यानंतर ते पुढे जाऊ शकतात. या तंत्रानंतर इमिग्रेशन प्रक्रियेस वेग आला आहे.

Boarding pass and identity card will be the face of DG Yatra scheme, plan of Ministry at seven airports

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण