औरंगाबाद नामांतर; शिवसेनेचे तेलही गेले, तुपही गेले; विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव तर आधी खासदार भागवत कराडांनी, विजया रहाटकरांनी हवाई वाहतूकमंत्र्यांना दिलाय

प्रत्यक्षात विमानतळाच्या नामांतराचा विषयही आधी भाजपच्या नेत्यांनीच पत्राद्वारे हवाई वाहतूक मंत्र्यांकडे मांडल्याचे स्पष्ट झाल्याने शिवसेनेच्या बाबतीत तेल गेले आणि तुपही गेले अशा म्हणीसारखी अवस्था झाली. आधी काँग्रेसने औरंगाबाद शहराच्या नामांतराचे तेल काढून घेतले. तर भाजपच्या नेत्यांनी आधीच विमानतळाच्या नामांतराचा विषय मांडून तुपही काढून घेतले. Aurangabad rename; Shiv Sena Looses Dignity; Earlier MP Bhagwat Karad and Vijaya Rahatkar proposed the renaming of the airport


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर शिवसेनेचे तेलही गेले, तुपही गेले हाती राहिले धुपाटणे अशी अवस्था झाली आहे. नामांतराविषयीच्या एकूण घटनाक्रमातून ही बाब स्पष्ट झाली आहे. 

त्याचे झाले असे… औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या रागाचा सामना करावा लागलेल्या ठाकरे – पवार सरकारने तथाकथित गमिनी कावा करत औरंगाबाद विमानतळाच्या छत्रपति संभाजी महाराज नामांतराचे पत्र केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांना पाठविले. त्यावरून स्वतःची पाठ थोपटून घेतली. पण प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांचे रिमांइडर पत्र जाण्यापूर्वीच भाजपचे खासदार डॉ. भागवत कराड आणि राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनीच हा विषय केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री हरदीप पुरी यांच्याकडे लावून धरला आहे. पुरी यांनी या पत्राची ताबडतोब दखल घेण्याचे आश्वासन देऊन ट्विटरवरून त्याची माहिती देखील दिली आहे.

आधी डॉ. भागवत कराडांनी औरंगाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपति संभाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्तावपत्र दिल्याचे ट्विटरवर स्पष्ट केले. त्याला प्रतिसाद देऊन हरदीप पुरी यांनी ते रिट्विट केले. हे काल सकाळी घडले. त्याच्या आधी परवा रात्री भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी दूरध्वनीवरून हरदीप पुरी यांच्याशी या विषयावर चर्चा केली.
आणि त्यानंतर काल सायंकाळी औरंगाबाद विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव ठाकरे – पवार सरकारने हवाई वाहतूक मंत्र्यांना पाठविल्याच्या बातम्या चालल्या. राज्य मंत्रिमंडळात तसा निर्णय झाल्याचे बातमीत म्हटले.वास्तविक विमानतळाच्या नामांतराचा विषय राज्य सरकारच्या नव्हे, तर केंद्र सरकारच्या आखत्यारित येतो. राज्य सरकारच्या आखत्यारित राज्यातील शहराच्या नामांतराचा विषय येतो. राज्य सरकार आपल्या अधिकारात तसे नामांतर करू शकते. विमानतळाच्या नामांतराची शिफारस राज्य सरकार करू शकते. पण निर्णय केंद्र सरकार घेते.

औरंगाबादच्या बाबतीत मूळात शहराच्या नामांतराचा मुद्दा तापलेला आहे. काँग्रेस अडून बसल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. ती कोंडी फोडण्यासाठी शहराच्या नामांतराऐवजी विमानतळाच्या नामांतराच्या प्रस्ताव केल्याच्या बातम्या चालविल्या गेल्या. जे मूळात राज्य सरकारच्या आखत्यारितच नाही, त्याचा निर्णय घेतल्याच्या त्या बातम्या होत्या.

Aurangabad rename; Shiv Sena Looses Dignity; Earlier MP Bhagwat Karad and Vijaya Rahatkar proposed the renaming of the airport

पण प्रत्यक्षात विमानतळाच्या नामांतराचा विषयही आधी भाजपच्या नेत्यांनीच पत्राद्वारे हवाई वाहतूक मंत्र्यांकडे मांडल्याचे स्पष्ट झाल्याने शिवसेनेच्या बाबतीत तेल गेले आणि तुपही गेले अशा म्हणीसारखी अवस्था झाली. आधी काँग्रेसने औरंगाबाद शहराच्या नामांतराचे तेल काढून घेतले. तर भाजपच्या नेत्यांनी आधीच विमानतळाच्या नामांतराचा विषय मांडून तुपही काढून घेतले. शिवसेनेचा मुख्यमंत्री असून देखील हाती धुपाटणे राहिले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*