वृत्तसंस्था
बागपत : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत “अब्बाजान” या राजकीय वक्तव्याला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुशीनगरच्या कार्यक्रमात “अब्बाजान” म्हणणाऱ्यांनी कुशीनगरच्या जनतेचे रेशन बांगलादेश आणि नेपाळला पळविले, असा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर “अब्बाजान”, “चाचाजान” हे शब्द राज्याच्या राजकारणात उसळून वर आले आहेत. BJP’s “Uncle Jaan” came to UP; But BJP will not file a case against them !!; Rakesh Tikait’s attack
उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलकांचे नेते राकेश टिकैत यांनी हाच “चाचाजान” हा शब्द उचलून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. हैदराबादचे एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या रूपाने भाजपचे “चाचाजान” उत्तर प्रदेशात आले आहेत. ते भाजपला भरपूर शिव्या देतील. त्या पक्षावर टीका करतील, पण भाजपने त्यांच्यावर केस करणार नाही. शेतकरी आंदोलकांवरच ते केसेस करत राहतील, असे टीकास्त्र राकेश टिकैत यांनी सोडले आहे.
"…BJP's Chacha Jaan, Asaduddin Owaisi has entered Uttar Pradesh. If he (Owaisi) will abuse them (BJP), they will not file any case against him. They are a team..": BKU leader Rakesh Tikait in Baghpat (14.09) pic.twitter.com/qaisUNKr8R — ANI (@ANI) September 15, 2021
"…BJP's Chacha Jaan, Asaduddin Owaisi has entered Uttar Pradesh. If he (Owaisi) will abuse them (BJP), they will not file any case against him. They are a team..": BKU leader Rakesh Tikait in Baghpat (14.09) pic.twitter.com/qaisUNKr8R
— ANI (@ANI) September 15, 2021
असदुद्दीन ओवैसी हे भाजपचे बी टीम असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. तसेच भाजपच्या बागपत येथील शेतकरी मेळाव्यात त्यांनी उत्तर प्रदेशमधील मुसलमानांना ओवैसी यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App