आसाम मध्ये 80 महापालिका – नगरपालिका निवडणुकीत भाजपचा प्रचंड विजय; भाजप 759 काँग्रेस 79 इतर 141

वृत्तसंस्था

गुवाहाटी : आसाम मध्ये महापालिका नगरपालिका यांच्या स्थानिक निवडणुकीत भाजपने आपल्या इतिहासातल्या प्रचंड ऐतिहासिक विजय मिळवला असून 80 महापालिका आणि नगरपालिकांच्या पैकी 70 नगरपालिकांमध्ये पूर्ण बहुमत आणि सत्ता स्थापन केली आहे. एकूण 977 जागांपैकी भाजपने 759 जागा जिंकल्या असून काँग्रेसने 76 तर अन्य प्रादेशिक स्थानिक पक्षांनी 141 जागा जिंकल्या आहेत.BJP wins in 80 municipal elections in Assam


सर्जीकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांवर आसाममध्ये होणार गुन्हा दाखल


आसाम मध्ये महापालिका आणि नगरपालिका मध्ये स्थानिक वार्ड स्तरीय पातळीपर्यंत पक्षीय पातळीवरच निवडणूक लढवली गेली होती. त्यामध्ये भाजपने काँग्रेसवर तसेच बद्रुद्दिन अजमल यांच्या डेमोक्रॅटीक फ्रंट वर स्थानिक निवडणुकीमध्येही प्रचंड मोठी मात केल्याचे दिसून येत आहे.

आसाम मध्ये भाजपने मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सीएए आणि एनआरसी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर राज्यातील सरकारी मदरशांचे अनुदान पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन निर्णयामुळे भाजपला मतदार कोणत्या पद्धतीचा प्रतिसाद देतील?, याविषयी राजकीय निरीक्षकांनी शंका व्यक्त केली होती. परंतु स्थानिक पातळीवर निवडणुकीत भाजपला प्रचंड विजय मिळाल्यामुळे राजकीय निरीक्षकांची शंका दूर झाली आहे.

BJP wins in 80 municipal elections in Assam

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात