उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी लागणार आहे.
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उद्या मतमोजणी आहे मात्र तत्पूर्वी एक मजेदार चित्र समोर आलं आहे.सपा चे उमेदवार दुर्बीण घेऊन EVM वर लक्ष ठेवत आहेेत. ईव्हीएम अदलाबदल किंवा कोणताही गैर प्रकार घडू नये म्हणून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आपल्या उमेदवारांना ईव्हीएमवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचंच पालन करत मेरठच्या हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातून सपाचे उमेदवार योगेश वर्मा हे ईव्हीएमवर लक्ष ठेवण्यासाठी चक्क दुर्बीण घेऊन मैदानात उतरले .त्यामुळे आता ईव्हीएम् मशीन वर हरल्याचे खापर फोडता येणार नाही .UP Election 2022: Samajwadi Party candidates themselves are watching EVM through binoculars ….
याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, ”या ठिकाणी ईव्हीएम ठेवण्यात आले आहेल. आम्ही दुर्बिणीद्वारे पाहत आहोत की, येथे कोणताही गैर प्रकार तर घडत नाही आहे ना. आम्ही दुर्बिणीद्वारे छतावर आणि संपूर्ण परिसरावर बारीक लक्ष ठेवून आहोत.” योगेश वर्मा पुढे म्हणाले की, या कामासाठी आम्ही 8-8 तासांच्या 3 शिफ्ट केल्या आहेत. ज्याच्या आधारे आता ते तैनात आहेत. याशिवाय आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र टीम तयार करण्यात आली असल्याचे ते म्हणाले आहेत.
योगेश वर्मा म्हणाले की, ”आमचा लढा सत्ताधारी पक्षाविरुद्ध असून गेल्या वर्षी झालेल्या पंचायत निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या निवडणूक नियमांचे घोर उल्लंघन पाहिल्यानंतर जनतेची मते गमावणे आम्हाला परवडणारे नाही.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App