गोव्यात कोणीही आले तरी भाजपला फरक पडणार नाही; ममता बॅनर्जींच्या दौर्‍यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा टोला


वृत्तसंस्था

पणजी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज गोव्याच्या राजकीय मोहीमेवर दाखल झाल्या आहेत. यावरून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांना टोला लगावला आहे. ममता बॅनर्जीच काय पण कोणीही आले तरी गोव्यात भारतीय जनता पार्टीला काही फरक पडणार नाही. विधानसभेची निवडणूक भाजप जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. BJP will not care if anyone comes to Goa; Chief Minister Pramod Sawant’s visit to Mamata Banerjee’s tour

ममता बॅनर्जी या भाजपवर तोंडी तोफा डागत असताना प्रत्यक्षात काँग्रेस पक्ष फोडताना दिसत आहेत. त्यांनी गोव्यात माजी मुख्यमंत्री लुईजिनो फालेरो यांना काँग्रेसमधून फोडून तृणमूल काँग्रेस मध्ये सामील करून घेतले आहे. गोव्यात त्यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढविण्याचा ममता बॅनर्जी यांचा इरादा दिसतो आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यमान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, गोव्यात सर्वांचे स्वागतच आहे. राज्यात गेली दहा वर्षे भाजपची सत्ता आहे. कै. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपने राज्यात चांगले काम करून दाखविले आहे. त्यांच्या निधनानंतर मी गेली अडीच वर्षे मुख्यमंत्री आहे. गोव्यातल्या जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि माझ्या सरकारच्या सेवाकार्यावर संपूर्ण विश्वास आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी किंवा अन्य कोणीही गोव्यात आले तरी भाजपच्या राजकीय भवितव्यावर किंवा विधानसभा निवडणुकीच्या निकालावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. विधानसभेची निवडणूक भाजपची जिंकेल, असा दावा त्यांनी केला आहे.

ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना “बाहेरचे नेते” असे संबोधले होते. परंतु गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मात्र ममता बॅनर्जी यांचे राज्यात आवर्जून “स्वागत” केल्याचे दिसत आहे.

BJP will not care if anyone comes to Goa; Chief Minister Pramod Sawant’s visit to Mamata Banerjee’s tour

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात