भाजपकडून उत्तर प्रदेशात ओबीसी, दलित नेत्यांच्या स्टार प्रचारकांची फौज, खºया अर्थाने सामाजिक न्यायाचा आदर्श घालून देणार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: सामाजिक न्यायाच्या गप्पा करताना केवळ काही कुटुंबांच्या हिताची काळजी करणाऱ्या समाजवादी पक्षाला खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय काय असतो हे दाखवून देण्यासाठी उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि दलित नेत्यांच्या स्टार प्रचारकांची फौज भाजपने उत्तर प्रदेशात उतरविली आहे. सामाजिक न्यायासाठी भाजपची ही बांधिलकी असल्याचे सांगण्यात येत आहे.BJP to set OBCs in Uttar Pradesh, an army of Dalit leaders’ star campaigners, to set an example of social justice

भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये धर्मेंद्र प्रधान, मुख्तार अब्बास नक्वी, संजीव बल्यान, जनरल व्ही.के. सिंग (निवृत्त), एस.पी. बघेल आणि निरंजन ज्योती प्रधान यांचा समावेश आहे. इतर मागासवर्गीय (ओबीसी) नेते स्वामी प्रसाद मौर्य आणि दारा सिंग चौहान पक्षातून बाहेर पडल आहेत. दलित आणि इतर मागासवर्गीयांकडे भाजप दूर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.



मात्र, हा आरोप केवळ राजकारणातून असल्याचे दाखवून देण्यासाठी भाजपने तयारी केली आहे. ३० स्टार प्रचारकांच्या यादीत दलित आणि ओबीसी नेत्यांसह सैनी, गुर्जर, लोध आणि निषाद समाजातील नेत्यांचा समावेश आहे. सात टप्यात होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील मतदान १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने पश्चिम उत्तर प्रदेशचा समावेश आहे.

यामध्ये शामली, मुझफ्फरनगर, बागपत, मेरठ, गाझियाबाद, गौतम बुद्ध नगर, हापूर, बुलंदशहर, अलीगढ, मथुरा आणि आग्रा या जिल्ह्यांतील ५८ जागांचा समावेश आहे. या भागात दलित (जाटव, पाल), ओबीसी (जाट, गुर्जर, लोध, निषाद, मल्ला, कश्यप) आणि मुस्लिम मतदारांची मोठी लोकसंख्या आहे. अलीगढमधील इग्लास विधानसभा मतदारसंघ जाटबहुल आहे. येथे जाट मतदारांची संख्या १ लाख आहे.

पण त्याचबरोबर बघेल समाजाचे ३० हजार, दलितांचे ५० हजार मतदान आहे. ही मते निर्णायक ठरणार आहेत. शामलीमध्ये ७० हजार जाट, ६५ हजार मुस्लिम यांच्यासह २० हजार गुर्जर, २५ हजार कश्यप आणि ४५ हजार दलित आहेत. कश्यप, गुर्जर, सैनी आणि जाटव नेत्यांना स्टार प्रचारक म्हणून तैनात करण्यात आले आहे. जाट मतांमध्ये कोणतीही घट झाल्यास त्याची भरपाई या समुदायांकडून होईल याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे.

पश्चिम उत्तर प्रदेशातील एक प्रमुख जाट नेता म्हणून संजय बलियान यांच्याकडे जाट मतांची जबाबदारी देण्यात आली आहे. व्ही.के. सिंह हे गाझियाबादचे खासदार आहेत. ते देखील प्रचारात उतरले आहेत.योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळात मंत्री असलेले भूपेंद्र सिंह चौधरी हे जाट नेतेही प्रचारात आहेत .

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह कुर्मी जातीचे प्रभावशाली नेते आहेत. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य मौर्य समाजाचे प्रमुख नेते आहेत. जसवंत सैनी, ज्यांची जून 2021 मध्ये उत्तर प्रदेश राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते सहारनपूरमधील प्रमुख सैनी नेते आहेत. आदित्यनाथ सरकारमधील मंत्री अशोक कटारिया यांचा पश्चिम उत्तर प्रदेशातील गुर्जर समाजापर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पाहोचवित आहेत.

मुरादाबाद, बरेली आणि मेरठ या गुर्जरांची मोठी संख्या असलेल्या भागात त्यांचा प्रभाव आहेत. त्यांच्या जोडील राज्यसभेचे खासदार आणिगुर्जर नेते सुरेंद्र सिंग नागर आहेत. केंद्रीय मंत्री बी.एल. वर्मा यांनाही स्टार प्रचाराकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. लोध समाजाचे असलेले वर्मा एक प्रमुख ओबीसी चेहरा आहेत, जे लोध समाजाचे आहेत. लोध समाज प्रामुख्याने कृषी समुदाय आहेत. वर्मा हे दिवंगत माजी मुख्यमंत्री आणि लोध नेते कल्याण सिंह यांचेही सहकारी होते. त्यांनीही २०२० मध्ये समाजवादी पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यादवेतर इतर मागासवर्गीयांपर्यंत हे नेते पोहोचत आहेत.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गौतम बुद्ध नगरच्या दादरीमध्ये नवव्या शतकातील राजा मिहिर भोज यांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या हस्ते अनावरण झाले होते. यावेळी राजपूत आणि गुर्जर यांच्यात वाद झाला होता. काही समाजकंटकांनी पुतळ्याच्या फलकावरील गुर्जर शब्दाला काळी शाई फासली होती. गुर्जरबहुल भागात भाजपने हा प्रचाराचा मुद्दा केला आहे.

इतर मागासवर्गीयांप्रमाणेच दलित समाजापर्यंत पोहोचण्यासाठीही भाजपने रणनिती आखली आहे. केंद्रीय राज्य मंत्री आणि आग्राचे खासदार सत्यपाल सिंह बघेल स्टार प्रचार आहेत. ते पाल या अनुसुचित जाती समुदायातील नेते आहे. बुलंदशहरचे खासदार भोला सिंह खाटिक हे स्टार प्रचारकही अनुसुचित जातीतील आहे.

राज्यसभा खासदार कांता कर्दम या जाटव समाजातील महिला नेत्या आहेत. निषाद (मच्छिमार) समाजातील प्रमुख चेहरा म्हणून निरंजन ज्योती आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशातील तराई पट्ट्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या संख्येने असलेल्या मल्ला समाजातील खासदार धर्मेंद्र कश्यप देखील स्टार प्रचारक आहेत.

सगळ्या राजकीय पक्षांनी राजकीय पक्षांनी सैनी, केवट आणि मल्लांसारख्या लहान ओबीसी जातींकडे दुर्लक्ष केले होते, परंतु भाजपने त्यांना पदे आणि सत्तेत वाटा दिला आहे. अखिलेश सरकारच्या काळात फक्त यादव आणि मुस्लिमांना सत्तेत वाटा होता.

भाजपने इतर जातींना न्याय दिला आहे, या धर्तींवर प्रचार केला जात आहे. त्यामुळे स्वामी प्रसाद मौर्य आणि दारा सिंह चौहान यांच्यासारख्या इतर मागासवर्गीय नेत्यांनी पक्ष सोडल्याचा काहीही परिणाम होणार नाही, असे भाजपचे म्हणणे आहे.

BJP to set OBCs in Uttar Pradesh, an army of Dalit leaders’ star campaigners, to set an example of social justice

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात