विशेष प्रतिनिधी
लखनऊ : तीन तलाकवर बंदीपासून घेतलेल्या निर्णयांमुळे मुस्लिम महिला खुश आहेत. कॉँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या मौलाना तौकीर यांच्या सुनेने तर आपण जीवंत आहोत ही भाजपचीच देणगी असल्याचे म्हटले आहे.Muslim women happy under Modi’s rule, daughter-in-law of Maulana Tauqeer who joined Congress said that we are alive is the gift of BJP
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या मौलाना तौकीर रझा यांच्या सुनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे. मौलाना तौकीर यांची सून निदा खान म्हणाल्या की, मोदींच्या राजवटीत महिला सुरक्षित आहेत. आपण जिवंत आहोत तर ती भाजपची देणगी आहे.
‘मुलगी आहे लढू शकते’ असा नारा देत निदा खान यांनी इत्तेहाद मिल्लत कौन्सिलचे प्रमुख मौलाना तौकीर यांच्यावर आरोप करताना त्या म्हणाल्या, जो व्यक्ती आपल्या घरचे प्रश्न सोडवू शकत नाही, तो समाजासाठी काय करणार. जेव्हा मी त्यांच्या घरी गेले तेव्हा माज्यावर अन्याय झाला. मला न्याय का मिळाला नाही?
भाजप सरकारने तिहेरी तलाक कायदा आणून मुस्लिम महिलांसाठी मोठे काम केले आहे. कारण, तिहेरी तलाक कायदा हा अतिशय घाणेरडा कायदा आहे. याविरुद्ध कोणीही आम्हाला साथ दिली नाही. आमचे दु:ख फक्त भाजप सरकारला समजले. फक्त भाजप सरकारनेच आम्हाला साथ दिली, अशा शब्दांत निदा खान यांनी मोदी सरकारचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, उत्तर प्रदेशातील गुंडगिरी थांबली
आज आपल्याकडे जे काही आहे, ते भाजपनेच दिले आहे. आपण जिवंत बसलो असलो तरी ते त्यांच्यामुळेच. समाजवादी पक्षाच्या सरकारच्या काळात आमच्यावर प्राणघातक हल्ले झाले. खोट्या केसेस लिहिल्या गेल्या, पण हे सर्व भाजप सरकारच्या काळात थांबले. गुंडगिरी पूर्णपणे थांबली आहे.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मौलाना तौकीर रझा म्हणाले होते की, काँग्रेसने आम्हाला 2009 मध्ये बाटला हाऊस एन्काउंटरची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची चौकशी झाली असती, तर जे मारले गेले त्यांना शहीद दर्जा द्यायला हवा होता, हे जगाला कळले असते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App