उत्तर प्रदेशात निवडणुकीचे पडघम लागले वाजू, सत्तारुढ भाजप लागला तयारीला


विशेष प्रतिनिधी

लखनौ : देशाची सत्ता मिळवण्यात नेहमी महत्वाची भूमीका अदा करणाऱ्या उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. केंद्रात सत्ता मिळवण्यात भाजपला मोलाची साथ दिलेल्या या राज्यात आता भाजपने संघटनात्मक पातळीवर फेरआढावा घ्यायला सुरुवात केली आहे. BJP start planning for UP election

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी.एल. संतोष यांनी आज राज्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांशी संवाद साधत परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याआधी देखील संतोष यांनी उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांची भेट घेत चर्चा केली होती. कामगारमंत्री स्वामीप्रसाद मौर्य यांच्याशीही ते बोलले होते..



या बैठकीनंतर मौर्य म्हणाले की, ‘‘ पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही ३०० जागा जिंकून दाखवू.’’ संतोष यांच्यासोबत केंद्रीयमंत्री राधामोहनसिंह यांचाही आढावा घेणाऱ्या नेत्यांच्या समितीत समावेश आहे. सायंकाळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरी आयोजित मेजवानीला हजेरी लावण्यापूर्वी त्यांनी स्थानिक नेत्यांची भेट घेत चर्चा केली.

BJP start planning for UP election

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात