बंगाल भाजपला आणखी एक धक्का, कालिगंजचे आमदार सौमेन रॉय यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

BJP MLA From Kaliaganj Soumen Roy Joins TMC In Kolkata West Bengal

BJP MLA From Kaliaganj Soumen Roy Joins TMC : पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. येथे कालिगंजमधील भाजपचे आमदार सौमेन रॉय यांनी पक्षाला निरोप देतानाच ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ते राज्यमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या उपस्थितीत कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले. सौमेन यांनी या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कालीगंज मतदारसंघातून तृणमूल उमेदवार तपन देब सिंघा यांचा 94,948 मतांनी पराभव केला होता. BJP MLA From Kaliaganj Soumen Roy Joins TMC In Kolkata West Bengal


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. येथे कालिगंजमधील भाजपचे आमदार सौमेन रॉय यांनी पक्षाला निरोप देतानाच ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ते राज्यमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या उपस्थितीत कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले. सौमेन यांनी या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कालीगंज मतदारसंघातून तृणमूल उमेदवार तपन देब सिंघा यांचा 94,948 मतांनी पराभव केला होता.

शिखा मित्रादेखील 29 ऑगस्ट रोजी टीएमसीमध्ये सामील झाल्या. यापूर्वी पश्चिम बंगाल काँग्रेसचे माजी अध्यक्ष (दिवंगत) सोमन मित्रा यांच्या पत्नी शिखा मित्राही 29 ऑगस्ट रोजी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) सामील झाल्या होत्या. यादरम्यान, शिखा यांनी दावा केला होता की मी 2014 मध्ये तृणमूल काँग्रेसच्या आमदारपदाचा राजीनामा दिला असला, तरीही मी कधीही अधिकृतपणे पक्ष सोडला नव्हता.

मित्रा म्हणाल्या होत्या की, माझ्या पतीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले, पण मी सक्रिय राजकारणातून ब्रेक घेतला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मला टीएमसीची सक्रिय कार्यकर्ता होण्यासाठी विनंती केली होती. त्यांचा साधेपणा आणि व्यक्तिमत्त्व पाहून मी खूप प्रभावित झाले.

पोटनिवडणुकीची घोषणा

दरम्यान, निवडणूक आयोगाने आंध्र प्रदेश, ओडिशासह पश्चिम बंगालच्या तीन विधानसभा जागांवर पोटनिवडणूक घेण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बंगालमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांमध्ये भवानीपूरची जागादेखील समाविष्ट आहे, जिथून मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना निवडणूक लढवायची आहे. 30 सप्टेंबर रोजी निवडणुका होणार आहेत आणि 3 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होतील.

BJP MLA From Kaliaganj Soumen Roy Joins TMC In Kolkata West Bengal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात