विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशात द्वेषाचा प्रोपोगंडा चलविण्यासाठी सोशल मीडियावर ई-रावण वापरत आहेत. अफवा, बनावट बातम्या पसरवित असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे.BJP is propagating E-Ravan hatred, Akhilesh Yadav alleges
अखिलेश यादव म्हणाले, समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत सतर्क राहावे. विरोधकांचे चारित्र्यहनन करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. मात्र, समाजवादी पक्षाने आपली सभ्यता सोडू नये. काही भाजपचे कार्यकर्ते समाजवादी पक्षात घुसले आहेत.
त्यांच्याकडून सोशल मीडियावर अभद्र टिपणी केली जात आहे. त्यांचा बुरखा फाडला पाहिजे. त्यामुळे माझे माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन आहे की त्यांनी सतर्क राहून संशयास्पद घटकांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट शेअर करू नये, प्रतिसाद देऊ नये किंवा पुढे पाठवू नये आणि पक्ष कार्यालयात याची तक्रार करावी.
समाजवादी पक्षाला लक्ष्य करणारी खोटी माहिती पसरवणाºयां विरोधात आक्रमक भूमिका घेत पक्षाने गेल्या आठवड्यात अज्ञात लोकांविरोधात पक्षप्रमुखांचे बनावट ट्विटर खाते तयार केल्याबद्दल आणि द्वेष पसरवल्याच्या तक्रारी दाखल केल्या. राज्य सपा प्रमुख नरेश उत्तम यांनी तक्रार दाखल केली.
अखिलेश यादव यांच्या नावाने एक बनावट ट्विट तयार करण्यात आले आहे. समाजवादी पक्ष सत्तेत आल्यानंतर अयोध्येतील राम मंदिराच्या ठिकाणी बाबरी मशिद बांधणार असल्याचा दावा या ट्विटमध्ये केला आहे.
कार्यकर्त्यांना सावध करताना यादव म्हणाले, राज्य निवडणुका जवळ आल्यामुळे, भाजपचे लोक काहीही करू शकतात. सत्ता बळकावण्यासाठी लोकांना मूर्ख बनवण्याद आसण खोटे बोलण्यात तज्ज्ञ आहेत. विकासासह मुख्य मुद्द्यांपासून लोकांचे लक्ष वळवणे हा त्यांचा हेतू आहे.
आम्ही कार्यकर्त्यांना सांगितले आहे की, सोशल मीडियावर भाषा वापरताना सभ्यता पाळावी. संयम बाळगावा. हे माध्यम संवाद साधण्यासाठी आहे. मात्र, दुर्दैवाने भाजप त्याचा गैरवापर करत आहे. भाजप साडेचार वर्षे राज्यावर असूनही या सरकारकडे सांगण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही. त्यामुळे भाजप खोट्या बातम्या पसरवित आहेत.
भाजप खोटे बोलून तीनशेहून अधिक जागा जिंकू शकतात तर आम्ही आमच्या सरकारने केलेल्या विकासकामांवर जास्त जागा का जिंकू शकत नाही असा सवाल करून अखिलेश यादव यांनी आगामी आगामी विधानसभा निवडणुकीत सामाजवादी पार्टी 350 जागा जिंकेल.
पेगासिस स्पायवेअरबाबत बोलताना अखिलेश यादव म्हणाले, संपूर्ण यंत्रणा आपल्या हातात असावी यासाठीचे हे षडयंत्र आहे. लोकशाही धोक्यात आली आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सपा लोकांचा आवाज उठवत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App