विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी – मिझोरामच्या पोलिसांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांसह काही बड्या पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. मिझोरामच्या कोलासीब जिल्ह्यात वैरेंगते पोलिस ठाण्यामध्ये याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे. हा भाग आसामच्या कचरलाच लागून आहे. मुख्यमंत्री हेमंत विश्वी सरमा यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. police-filed-fir-against-assam-cm
सरमा यांच्या सूचनेवरून काम करणारे आसामचे पोलिस कर्मचारी त्या दिवशी कोणाचेही काही ऐकण्याच्या तयारीत नव्हते. त्यांना मिझोरामच्या पोलिसांशी चर्चा करायचीच नव्हती. कोलासीबच्या पोलिस अधिकाऱ्यांना देखील येथील काही भाग हा आसामचा असल्याचे सांगत त्यांनी बळजबरीने छावणी उभारायला सुरुवात केली होती.’’ असेही या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री हेमंत विश्व सरमा म्हणाले, कोणत्याही प्रकारच्या चौकशीला आपण आनंदाने सामोरे जाऊ. हे प्रकरण तटस्थ अशा तपास संस्थेकडे का सोपविण्यात आले नाही? ज्या भागामध्ये ही घटना घडली तो आसामच्या हद्दीत आहे, हे ठावूक असताना देखील ही कारवाई करण्यात आली.
police-filed-fir-against-assam-cm
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App