भाजप घराणेशाहीचा नव्हे, तर जनतेशी नाळ जुळलेला पक्ष; पंतप्रधान मोदींचा काँग्रेससह विरोधकांना टोला


प्रतिनिधी

नवी दिल्ली : भाजप हा घराणेशाहीवर आधारित राजकारण करणारा पक्ष नाही. तर जनतेशी नाळ जुळलेला जुळलेला पक्ष आहे. सेवा हेच संघटन हे आपले ब्रीदवाक्य आहे. हे पुढे चालवले तर भाजपला यश मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.BJP is not a dynastic party, but a party connected with the people; Prime Minister Modi slammed the opposition, including the Congress

पंतप्रधान मोदी यांनी रविवारी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित केले. सेवा हीच सर्वात मोठी पूजा आहे. कोरोना काळात कार्यकर्त्यांनी सेवेची नवी संस्कृती सुरू केली आहे. देशाच्या राजकारणात पक्षाने आज जे यश मिळवले आहे त्याचे प्रमुख कारण म्हणजे जनतेशी जुळलेली नाळ आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.पंतप्रधानांनी विरोधी पक्षांवर विशेषत: काँग्रेसवर निशाणा साधला. भाजप हा घराणेशाहीवर आधारित पक्ष नाही. तर कार्यकर्त्यांचे काम असलेला पक्ष आहे, असा टोला लगावला. पंतप्रधानांच्या भाषणाची माहिती केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

आगामी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकारिणीची आज दिल्लीत बैठक झाली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, की भाजपच्या कार्यकर्त्यांना सामान्यांच्या मनात विश्वासाचा सेतू बनले पाहिजे. देशाच्या राजकारणात पक्षाने आज जे यश मिळवले आहे त्याचे प्रमुख कारण म्हणजे जनतेशी जुळलेली नाळ आहे. भाजप हा घराणेशाहीवर आधारित पक्ष नाही.

सेवा, दृढनिश्चय आणि समर्पण या मूळ संकल्पनेशी पक्ष जुळलेला आहे. पक्षाच्या परंपरांना पुढे नेत कष्ट आणि परिश्रम यामुळे आपण पुढे गेलो आहोत. भाजप कार्यकर्त्यांना आगामी काळात याच विश्वासाने आणि आपलेपणाच्या भावनेने पुढे जायचे आहे.

उत्तर प्रदेश, पंजाबसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. यासाठी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्ष कार्यकर्त्यांना वातावरण निर्मिती तयार करण्याचे आणि पक्ष संघटना बळकट करण्यासाठी काही सूचना दिल्या. भाजप गेल्या ७ वर्षांपासून केंद्रात सत्तेत आहे आणि पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. पण भाजपचा परमोत्कर्ष अद्याप येणे बाकी आहे, असे नड्डा म्हणाले.

BJP is not a dynastic party, but a party connected with the people; Prime Minister Modi slammed the opposition, including the Congress

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती