भाजपची उमेदवार यादी : योगी अयोध्येतून नव्हे, तर गोरखपूर मधूनच लढणार; केशव प्रसाद मौर्य सिराथूतून मैदानात!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात सत्ताधारी भाजपला गळती लागलेली असताना भाजपने राजधानी नवी दिल्लीत आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्येतून अथवा मथुरेतून निवडणूक लढवण्याचा अटकळी खोट्या ठरल्या आहेत. योगी आदित्यनाथ हे गोरखपुर सदर या मतदारसंघातून निवडणूक लढणार असून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे सिराथू मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.BJP candidate list: Yogi will fight not from Ayodhya, but from Gorakhpur

भाजपचे उत्तर प्रदेश प्रभारी धर्मेंद्र प्रधान आणि अरुण प्रकाश यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत भाजपची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये प्रामुख्याने विद्यमान आमदारांना प्राधान्य देण्यात आले असून उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा मतदारसंघ जेथे तब्बल 10 लाख मतदार आहेत अशा साहिबाबाद विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सुनील शर्मा यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.त्याचबरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्येतून अथवा मथुरेतून निवडणुकीच्या मैदानात उतरणार अशा अटकळी बांधण्यात आल्या होत्या. भाजपमधून देखील त्याच्या मागण्या झाल्या होत्या. परंतु या अटकळी भाजप पक्षश्रेष्ठींनी खोटा ठरवत योगी आदित्यनाथ यांना गोरखपूर सदर याच मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.

– गोरखपूरच का??

गोरखपूर मतदारसंघ हा योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे त्यांना निवडणूक सोपी जाईल. त्याचबरोबर राज्यात अन्य मतदारसंघांवर देखील लक्ष केंद्रित करता येईल, असा भाजप पक्षश्रेष्ठींचा होरा आहे. शिवाय दुसरे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा हे मथुरेतून विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे त्यांना बाजूला करून योगी आदित्यनाथ यांना मथुरेतून लढवणे हे भाजप पक्षश्रेष्ठींना रुचलेला दिसत नाही. त्यामुळेच त्यांना गोरखपूर सदर मतदारसंघातून मैदानात उतरवण्याचा निर्णय झाला असावा असे मानण्यात येत आहे.

BJP candidate list: Yogi will fight not from Ayodhya, but from Gorakhpur

महत्त्वाच्या बातम्या