त्रिपुरात भाजप १० नगरपंचायतींमध्ये १००% बिनविरोध; ११ आगरतळा महापालिकेसह १४ नगरपंचायतींमध्ये ९८% यश; सर्व विरोधकांना मिळून ५ जागा!!

प्रतिनिधी

नवी दिल्ली/आगरतळा : त्रिपुराचे राजकीय यशाचे गणित काही वेगळेच झाले आहे. तृणमूल काँग्रेसने जी “प्रचंड” हवा निर्माण केली होती ती किती फुसकी होती हे या निवडणुकीने सिद्ध केले आहे. त्रिपुरात आज झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 10 नगरपंचायती तर बिनविरोध 100% भाजपच्या पारड्यात आल्या आहेत.BJP 100% unopposed in 10 Nagar Panchayats in Tripura; 98% success in 14 Nagar Panchayats including 11 Agartala Municipal Corporation; 5 seats for all opponents

तिथल्या एकही जागेवर विरोधी उमेदवारच नव्हते. आगरतळा महापालिकेसह उरलेल्या 14 नगरपंचायतींमध्ये भाजपला 98% यश मिळाले आहे. आगरतळा महापालिकेच्या 51 पैकी 51 जागा भाजपने जिंकल्या आहेत.



तृणमूळ काँग्रेससह सर्व विरोधकांना फक्त पाच जागांवर समाधान मानावे लागले आहे. या 14 नगरपंचायतीने मध्ये 222 जागांवर निवडणूक झाली. त्यापैकी 217 जागा भाजपने जिंकल्या आहेत.कोणत्याही निवडणुकीत एखाद्या राजकीय पक्षाला त्यातही स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीत एखाद्या राजकीय पक्षाला मिळालेले हे अभूतपूर्व यश आहे.

अनेक स्थानिक निवडणुका बिनविरोध होतात. आपापसात राजकीय तडजोडी करून वर्षानुवर्षे ग्रामपंचायती, नगरपंचायती बिनविरोध केल्या जातात. परंतु निवडणूक लढवल्या नंतर इतके निर्भेळ यश तेसुद्धा 98 टक्क्यापर्यंतचे यश ही दुर्मिळ राजकीय घटना आहे. भाजपच्या बाबतीत ही दुर्मिळ घटना त्रिपुरात घडली आहे.

तृणमूल काँग्रेसने गेल्या सहा महिन्यांमध्ये विशेषतः पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी प्रचंड यश मिळवल्यानंतर त्रिपुरामध्ये विशेष करून लक्ष घातले होते. खासदार अभिषेक बॅनर्जी हे त्रिपुरामध्ये विशेष राजकीय रस दाखवत आहेत. तरी देखील तृणमूल काँग्रेसला तिथे तुटपुंजे म्हणावे असेही यशही मिळाले नाही. कारण तिथे फक्त 21 नगरपंचायत तीन पैकी एक जागा तृणमूळ काँग्रेसला मिळू शकली आहे.

एकेकाळी संपूर्ण त्रिपुरावर डाव्या पक्षांचे वर्चस्व होते. त्यांचा देखील सुपडा अक्षरश: साफ झाला आहे. किंबहुना ईशान्य भारतातूनच डावे पूर्णपणे संपले आहेत. पश्चिम बंगाल विधानसभेत आता डाव्या पक्षांचा एकही आमदार उरलेला नाही. त्रिपुरा देखील त्यांची तशीच अवस्था झाली आहे. स्थानिक पातळी वरचे सगळे कॅडर नष्टप्राय झाले आहे. त्यामुळे भाजपने त्रिपुरात किती यश मिळवले ह्यापेक्षा सर्व विरोधकांना मिळून पाच जागा मिळाल्या हीच बातमी महत्त्वाची ठरली आहे.

ममता बॅनर्जी या पश्चिम बंगाल सोडून स्वतःची राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी देशात इतरत्र फिरत आहेत. परंतु, त्यांनी राजकीयदृष्ट्या टार्गेट केलेल्या राज्यात म्हणजे त्रिपुरात त्यांची काय अवस्था झाली आहे हे दिसल्यानंतर ममतांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा इतर छोटा राज्यांमधून कशी काय पूर्ण होईल? या विषयी ठळक प्रश्नचिन्ह लागले आहे.

BJP 100% unopposed in 10 Nagar Panchayats in Tripura; 98% success in 14 Nagar Panchayats including 11 Agartala Municipal Corporation; 5 seats for all opponents

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात