बिहार- उत्तर प्रदेशातील मजुरांकडून पंजाबमध्ये वेठबिगारी, जास्त काम करावे म्हणून शेतकरी देतात अंमली पदार्थ, केंद्रीय गृहमंत्रालयाचीच माहिती


पंजाबमधील शेतीमध्ये काम करण्यासाठी बिहार, उत्तर प्रदेशातून मजुरांना जादा पगाराचे आमिष दाखवून आणले जाते. त्यांच्याकडून वेठबिगारी करून घेतली जाते. ऐवढेच नव्हे तर त्यांनी जास्त काम करावे म्हणून त्यांना अंमली पदार्थही दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  Bihar-Uttar Pradesh laborers resort to forced labor in Punjab, farmers give drugs to make them work harder, Union Home Ministry says


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंजाबमधील शेतीमध्ये काम करण्यासाठी बिहार, उत्तर प्रदेशातून मजुरांना जादा पगाराचे आमिष दाखवून आणले जाते. त्यांच्याकडून वेठबिगारी करून घेतली जाते. ऐवढेच नव्हे तर त्यांनी जास्त काम करावे म्हणून त्यांना अंमली पदार्थही दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत पंजाबच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून चौकशी करण्यास सांगितले आहे. पंजाबमधील सीमेवरील जिल्ह्यात हा गंभीर प्रश्न बनला आहे. याठिकाणी अनेक वेठबिगार मजूर शेतकऱ्यांकडेकाम करत आहेत. त्यांच्याशी अत्यंत अमानवी पध्दतीने वागले जाते,असेही केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे.



बिहार आणि उत्तर प्रदेशातील दुर्गम भागातील अत्यंत गरीब कुटुंबांतील या मजुरांवर वेठबिगाराचे जिणे जगण्याची वेळ आली आहे.मानवी तस्करीचे मोठे सिंडीकेट यासाठी काम करत आहे. गावातून या मजुरांना चांगल्या पगाराचे आमिष दाखवून पंजाबला नेले जाते. मात्र, तेथे त्यांचे शोषण होते. या मजुरांना अंमली पदार्थांची सवय लावली जाते. त्यामुळे त्यांचे मानसिक आणि शारीरिक खच्चीकरण होते.

पंजाबचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना लिहिलेल्या या पत्रात केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे की हा अत्यंत जटील प्रश्न बनला आहे. त्यामध्ये मानवी तस्करी, वेठबिगारी आणि मानवाधिकारांचे हनन होत आहे. त्यामुळे तातडीने याची दखल घ्यावी.

Bihar-Uttar Pradesh laborers resort to forced labor in Punjab, farmers give drugs to make them work harder, Union Home Ministry says


महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात