DCGI approves Hetero Tocilizumab : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. याचबरोबर लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. वाढत्या कोरोना संसर्गादरम्यान आता एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. हेटेरोने घोषित केले आहे की, रुग्णालयात दाखल प्रौढांमध्ये कोरोनाच्या उपचारासाठी भारतातील Tocilizumabच्या जेनेरिक व्हेरिएंटच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे. Big News DCGI approves Hetero Tocilizumab for treatment of COVID 19 in hospitalised adults
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. याचबरोबर लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. वाढत्या कोरोना संसर्गादरम्यान आता एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. हेटेरोने घोषित केले आहे की, रुग्णालयात दाखल प्रौढांमध्ये कोरोनाच्या उपचारासाठी भारतातील Tocilizumabच्या जेनेरिक व्हेरिएंटच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे.
कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, हे औषध सिस्टेमॅटिक कॉर्टिकोस्टिरॉईड्स, अत्यावश्यक पूरक ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि एक्स्ट्राकोर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (ईसीएमओ) वर असलेल्या रुग्णांसाठी वापरले जाऊ शकते. कंपनीने देशातील Tocilizumab (Tosira) ला मंजुरी दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. कंपनीने म्हटले की, औषधाचे न्याय्य वितरण सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सरकारसोबत जवळून काम करू.
हेटेरो समूहाचे अध्यक्ष डॉ बी पार्थ सारधी रेड्डी म्हणाले की, टोसिलिझुमाबची जागतिक कमतरता पाहता भारतातील चांगल्या पुरवठ्यासाठी ही मान्यता महत्त्वपूर्ण आहे. TOCIRA (Tocilizumab) ची विक्री त्यांची उपकंपनी ‘हेटेरो हेल्थकेअर’ भारतात करेल. देशभरात कंपनीच्या मजबूत नेटवर्कद्वारे ते वितरणावर भर दिला जाईल. हेटेरोचे बायोलॉजिक्स युनिट ‘हेटेरो बायोफार्मा’ हैदराबादमधील त्यांच्या युनिटमध्ये औषधाची निर्मिती करणार आहे. टोसिरा हे औषध सप्टेंबरच्या अखेरीस देशात उपलब्ध होईल.
Big News DCGI approves Hetero Tocilizumab for treatment of COVID 19 in hospitalised adults
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App