बंगालमध्ये पास होऊनही हजारो युवक नोकरीच्या प्रतिक्षेत; यूपीत क्रीडा विभागात ५३४ जणांची भरती


वृत्तसंस्था

कोलकाता : लखनौ – पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश ही राज्ये एकमेकांच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षभरापासून राजकीय चर्चेत आणली आहेत. या पार्श्वभूमीवर दोन राज्यांमधल्या युवकांचे प्रातिनिधिक फोटो आज समोर आले आहेत.BIG difference in west benagl and UP; youths are waiting for job in bengal, 534 youths get job in UP

बंगालमध्ये पोलीस कॉन्स्टेबलपदाची परीक्षा पास होऊनही नियुक्तीची पत्रे न मिळालेल्या हजारो युवकांनी कोलकात्यात भवानी भवनमधील सीआयडी ऑफीससमोर धरणे आंदोलन केले.



हे सगळे युवक कॉन्स्टेबलपदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत पास झाले आहेत. परंतु, त्यांना ममतांच्या राज्य सरकारने अद्याप त्यांना नियुक्ती पत्रे दिलेली नाहीत. त्यामुळे त्यांनी कोलकात्यात एकत्र येऊन सीआयडी ऑफीस समोर धरणे धरले होते.

उत्तर प्रदेशात ५३४ युवकांना नियुक्ती पत्रे

तिकडे उत्तर प्रदेशात योगींच्या राज्य सरकारने ५४३ युवकांना युवक कल्याण आणि विभागीय विकास विभागात नोकरी दिल्याची नियुक्ती पत्रे दिली आहेत. उत्तर प्रदेश क्रीडा विभागाच्या परीक्षांमधून त्यांची निवड करण्यात आली आहे.

हे युवक राज्यांच्या विविध विभागांमध्ये क्रीडा प्रशिक्षण आणि सुविधा निर्मितीचे प्रयोग करतील. योगी सरकारने राज्यातील युवकांना आधुनिक क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण देण्यासाठी १० वर्षांची मेगा योजना आखली आहे. युवकांच्या पारंपरिक कौशल्याला आधुनिक प्रशिक्षणाची जोड देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमध्ये चमकवण्यासाठी ही योजना आहे.

आज ज्या ५३४ युवकांना नियुक्ती पत्रे देण्यात आली, ते सगळे राज्याच्या ग्रामीण भागात नियुक्त करण्यात आले आहेत. तेथील युवकांचे कौशल्य ओळखून त्यांना क्रीडा प्रशिक्षण आणि सुविधा मिळवून देणे हा त्यांच्या जॉब प्रोफाइलचा मुख्य भाग आहे.

BIG difference in west benagl and UP; youths are waiting for job in bengal, 534 youths get job in UP

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात