Bharat Biotech : देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गात वाढ होत असताना आता कोरोना लसीबद्दल एक चांगली बातमी समोर आली आहे. ड्रग रेग्युलेटरच्या सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटी (एसईसी) ने भारत बायोटेकची कोरोनावरील लस कोव्हॅक्सिनच्या चाचणीत भाग घेतलेल्या स्वयंसेवकांना तिसरा डोस चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. हैदराबादस्थित कंपनीने दोन डोसनंतर तिसर्या म्हणजे बूस्टर डोसच्या चाचणीसाठी औषध नियामकांकडे प्रस्ताव पाठवला होता. Bharat Biotech vaccine covaxin booster dose approved by SEC
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गात वाढ होत असताना आता कोरोना लसीबद्दल एक चांगली बातमी समोर आली आहे. ड्रग रेग्युलेटरच्या सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटी (एसईसी) ने भारत बायोटेकची कोरोनावरील लस कोव्हॅक्सिनच्या चाचणीत भाग घेतलेल्या स्वयंसेवकांना तिसरा डोस चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. हैदराबादस्थित कंपनीने दोन डोसनंतर तिसर्या म्हणजे बूस्टर डोसच्या चाचणीसाठी औषध नियामकांकडे प्रस्ताव पाठवला होता.
चाचणीच्या टप्प्यात सहभागी स्वयंसेवकांना लसीच्या दुसऱ्या डोसनंतर 6 महिन्यांनी तिसरा डोस देण्यास एसईसीने मंजुरी दिली आहे. बूस्टर डोस दिल्यानंतर 6 महिन्यांपर्यंत भारत बायोटेक त्यांच्या आरोग्याशी संबंधित माहिती घेत राहील. या तिसऱ्या डोसमुळे त्यांच्या शरीरातील प्रतिकारशक्तीत काय बदल होतो, ते विषाणूच्या नवनव्या रूपांना कसे सामोरे जातात, याचाही अभ्यास करण्यात येणार आहे.
कोव्हॅक्सिनचा तिसरा डोस लागू झाल्यानंतर कोरोना विषाणूविरुद्ध शरीराची प्रतिकारशक्ती अनेक वर्षांपर्यंत वाढेल, असा विश्वास भारत बायोटेकने सरकारकडे व्यक्त केला होता. यासह कोविड-19 चे नवीन रूपांपासूनही संरक्षण मिळेल. नवे स्ट्रेन म्युटेशन करू शकणार नाहीत. यानंतर एक्स्पर्ट पॅनलने बूस्टर डोसला मंजुरी दिली आहे.
Bharat Biotech vaccine covaxin booster dose approved by SEC
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App