ना सिद्धू, ना जाखड पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून सुखजिंदर रंधावा यांच्या नावावर सहमती, राज्यपालांना भेटीची वेळ मागितली

Beside Siddhu Or Jakhar MLA Sukhjinder Randhava Will Be Next CM Of Punjab, Likely to take Oath Soon

Sukhjinder Randhava Will Be Next CM Of Punjab : अंबिका सोनी म्हणाल्या की, पंजाबमध्ये मुख्यमंत्री म्हणून शीख चेहराच हवा. आज होणारी विधिमंडळ पक्षाची बैठक रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांनी म्हटले आहे की, नवज्योत सिंग सिद्धू यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना आपण विरोध करू. यामुळे आता सर्व आमदारांच्या मते सुखजिंदर रंधावा यांच्या नावावर सहमती झाल्याचे वृत्त आहे. Beside Siddhu Or Jakhar MLA Sukhjinder Randhava Will Be Next CM Of Punjab, Likely to take Oath Soon


विशेष प्रतिनिधी

चंदिगड : कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबचे पुढील मुख्यमंत्री कोण असतील? आता हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. आज सकाळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आले, पण थोड्याच वेळात ही बातमी आली की त्यांनी स्वतः या पदासाठी नकार दिला आहे. अंबिका सोनी म्हणाल्या की, पंजाबमध्ये मुख्यमंत्री म्हणून शीख चेहराच हवा. आज होणारी विधिमंडळ पक्षाची बैठक रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांनी म्हटले आहे की, नवज्योत सिंग सिद्धू यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना आपण विरोध करू. यामुळे आता सर्व आमदारांच्या मते सुखजिंदर रंधावा यांच्या नावावर सहमती झाल्याचे वृत्त आहे.

सुखजिंदर रंधावा नवे मुख्यमंत्री

पंजाबमधील काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदासाठी पंजाब काँग्रेसने सुखजिंदर रंधवा यांचे नाव अंतिम केले आहे. या नावावर काँग्रेस हायकमांडकडून ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा आहे. काँग्रेस हायकमांड लवकरच या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करू शकते. काँग्रेसच्या आमदारांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांचे नाव आजच अंतिम केले जाईल. 62 वर्षीय सुखजिंदर सिंह रंधावा हे पंजाबच्या डेरा बाबा नानक मतदारसंधाचे आमदार आहेत. सध्या ते राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांच्याकडे सहकार आणि कारागृह विभाग आहे.

हे असतील उपमुख्यमंत्री

काँग्रेसने पंजाबसाठी दोन उपमुख्यमंत्र्यांची नावेही निश्चित केली आहेत. दलित समाजातून आलेल्या अरुणा चौधरी पंजाबच्या उपमुख्यमंत्री होतील, तर भारत भूषण आशु यांना हिंदू कोट्याअंतर्गत उपमुख्यमंत्री बनवले जाईल.

अंबिका सोनी राहुल गांधींच्या भेटीला

दरम्यान, बातम्या येत आहेत की पंजाबचे मुख्यमंत्रिपद नाकारल्यानंतर अंबिका सोनी आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दिल्लीतल्या घरी पोहोचल्या आहेत. येथे राज्याच्या पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते. अंबिका सोनी म्हणाल्या की, पक्षात कोणताही वाद नाही आणि नवीन मुख्यमंत्रिपदाचे नाव आज जाहीर केले जाईल. त्या म्हणाल्या की, पंजाबचा मुख्यमंत्री एखादा शीखच असला पाहिजे.

सोनिया-राहुल यांची अंबिका सोनींशी चर्चा

दरम्यान, अंबिका सोनींशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोघेही काल रात्री अंबिका सोनींशी बोलले होते. अंबिका म्हणाल्या की, त्यांनी त्यांच्या विवेकाचा आवाज ऐकून हे पद नाकारले. त्या म्हणाल्या की, त्यांचे पंजाबशी घनिष्ठ नाते आहे. पण पंजाबमध्ये एका शीखाला मुख्यमंत्री केले पाहिजे. विविध मीडिया रिपोर्टनुसार, नवज्योतसिंग सिद्धू हेही अंबिका सोनींशी बोलले, पण त्या म्हणाल्या की, त्यांना अशी कोणतीही जबाबदारी घ्यायची नाही, ज्याबद्दल त्यांना स्वतःला अजून खात्री नाही.

Beside Siddhu Or Jakhar MLA Sukhjinder Randhava Will Be Next CM Of Punjab, Likely to take Oath Soon

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात