Bengal Violence : बंगाल हिंसाचाराची मानवाधिकार आयोगासह महिला आयोगाकडून दखल, चौकशीचे आदेश

Bengal Violence National Human Rights Commission orders Inquiry, Women's Commission took cognizance

Bengal Violence : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. तृणमूल काँग्रेसची तिसऱ्यांदा सत्ता आल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षातील प्रामुख्याने भाजप कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात जीवघेणे हल्ले केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 11 जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. बंगालचे भाजपअध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, राज्यातील हिंसाचाराने मर्यादा ओलांडली आहे. राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांची हत्या, लूटमार, तोडफोड व जाळपोळ तसेच महिलांचाही लैंगिक छळ झाला आहे. बंगालमधील हिंसेची दखल आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि महिला आयोगाने घेतली असून याप्रकरणी चौकशीचेही आदेश दिले आहेत. Bengal Violence National Human Rights Commission orders Inquiry, Women’s Commission took cognizance


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. तृणमूल काँग्रेसची तिसऱ्यांदा सत्ता आल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षातील प्रामुख्याने भाजप कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात जीवघेणे हल्ले केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 11 जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. बंगालचे भाजपअध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, राज्यातील हिंसाचाराने मर्यादा ओलांडली आहे. राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांची हत्या, लूटमार, तोडफोड व जाळपोळ तसेच महिलांचाही लैंगिक छळ झाला आहे. बंगालमधील हिंसेची दखल आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि महिला आयोगाने घेतली असून याप्रकरणी चौकशीचेही आदेश दिले आहेत.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मंगळवारी बंगालमधील हिंसाचाराची दखल घेतली आणि पथकाला चौकशीचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटले की, विधानसभा निवडणुकीनंतर नंदीग्राममध्ये महिलांनाही मारहाण केली जात आहे. भाजपच्या शुभेंदू अधिकारी यांनी 1956 मतांनी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव केल्याने तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. हल्दिया आणि नंदीग्रामच्या वेगवेगळ्या भागांत हिंसाचार सुरू असल्याचेही वृत्त विविध माध्यमांनी दिले आहे.

भाजप कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या

सोमवारी राज्यात मोठा हिंसाचार झाला होता. यामध्ये अनेक भाजप कार्यकर्त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. अनेक जण जखमी झाले होते. केंद्रीय गृहमंत्रालयाने या हिंसक घटनांवर राज्य सरकारकडे तथ्यात्मक अहवाल मागविला आहे. निवडणुकीच्या निकालाच्या 24 तासांच्या आत 5 भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजप नेत्यांनी सोमवारी केला.

याशिवाय अनेक भाजप समर्थकांच्या घरांची तोडफोड करण्यात आली असून ठिकठिकाणी पक्षाच्या कार्यालयाला आग लावण्यात आली आहे. भाजपनं पक्षाच्या कार्यालयात जाळपोळ केल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. याशिवाय बंगालमधील हिंसेचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल हेात आहेत.

Bengal Violence National Human Rights Commission orders Inquiry, Women’s Commission took cognizance

महत्त्वाची बातमी

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात